ठाणे : वर्षभरासाठी खाद्यपदार्थांची साठवण करण्यासाठी उन्हाळ्यात गृहिणींची धावपळ सुरू असते. वर्षभराचा मसाला बनवण्यासाठी उत्तम हंगाम म्हणजे जानेवारी ते मे महिना. कारण या काळात ऊन छान कडक असतं आणि पदार्थही ताजे मिळतात. शिवाय एकदा पदार्थांची साठवण केली की पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काही बघायला नको. परंतु आता पाऊस सुरू झालाय, त्यामुळे तुमचा मसाला बनवायचा राहिला असेल तर काळजी नको.
advertisement
अनेक ठिकाणी घरगुती साठवणीचे मसाले उत्तम दरात मिळतात. ठाण्यातही असंच एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. ठाणे स्टेशनपासून अगदी 20 मिनिटांच्या अंतरावर असलेलं 'फुले मार्केट' हे 'मसाल्यांचं मार्केट' म्हणून ओळखलं जातं.
हेही वाचा : चपात्या कधीच मोजून बनवण्याची चूक करू नका! घरात अठराविश्वे दारिद्र्य येण्याची शक्यता
इथं कोणते मसाले मिळतात?
आपल्याला हॉटेलचं, मित्र-मैत्रिणींच्या घरचं किंवा जगाच्या पाठीवर कोणाच्याही घरचं जेवण आवडत असलं, तरी आपल्या स्वतःच्या घरच्या जेवणाची सर कशालाच येत नाही. कारण आपल्याकडे स्वयंपाक बनवण्याची पद्धत वेगळी असते, आपल्या सवयीची असते, आपले मसाले वेगळे असतात. हीच आवड लक्षात घेऊन फुले मार्केटमध्ये मालवणीपासून आगरी मसाल्यांपर्यंत अगदी सर्व प्रकारचे मसाले अगदी स्वस्त दरात मिळतात. शिवाय तुम्हाला हवा तसा मसालाही इथं बनवून घेऊ शकता.
अनेक महिला इथं वर्षभराचा मसाला बनवून घेतात. त्यात तुमच्या आवडीनुसार गरम मसाले, मिरच्या आणि इतर मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. या मसाल्याचा भाव सुरू होतो 500 रुपयांपासून. त्यामुळे तुम्ही अजूनही घरात मसाला बनवला नसेल किंवा विकत घेतला नसेल, तर यावेळी ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये जाऊन वर्षभराचा मसाला स्वतः तयार करून घेऊ शकता.