असा करा कढीपत्ता उपयोग
कढीपत्ता हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. जर तुमच्या घरचे व्यक्ती जेवणातून कढीपत्ता काढून टाकत असतील तर कढीपत्ता मिक्सरमधून काढून भाज्यांमध्ये,कढीमध्ये किंवा चटणीमध्ये घाला कारण अशा पद्धतीने जेवणातून कढीपत्ता बाहेर काढल्या जाणार नाही, अन्नाची चव वाढेल आणि शरीराला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. रोजच्या जेवणामध्ये कढीपत्ताचा समावेश करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीराततली जी काही कमतरता असेल ती भरून निघण्यासाठी मदत होते, असं सरोज दाते सांगतात.
advertisement
तुमच्या अंगातलं रक्त हा जीव घेतो शोषून, झटक्यात करतो बरं! VIDEO
रक्तातील शुगर करते नियंत्रणात
कढीपत्यायामध्ये अँटी ऑक्सिडेंटस आहेतच तसेच एंजाइम पण आहेत, शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कारण त्यात फायबर आहेत. त्यामुळे शुगर असलेल्या रुग्णांनी कढीपत्ता खाणे फायदेशीर ठरेल. कढीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट तसेच थोडा फॅट पण आहे (100 ग्राम या नुसार सांगत आहे) कढीपत्ता मध्ये विटामिन सी आहे. कढीपत्तामध्ये विटामिन सी हे 100 ग्रॅममध्ये चार आहेत. त्याच्यात 0.93 असं आयन कन्टेन्ट आहे आणि शिवाय त्याच्यात 1.08 इतके कॅलरीज आहे.
कोलेस्टेरॉल करते कमी
कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम करते. बॅड फॅट काढून टाकतात, कोलेस्ट्रॉल आणि जे बॅड फॅट असतात ते रिमूव करण्याचं काम करते. अशाप्रकारे कढीपत्ता आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आहे. कच्चा कढी पत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीरात वॉटर सोल्युब विटामिन्स असतात ते नष्ट होत नाही. कढी पत्ता धुवायचा आणि तसाच तो जेवणाबरोबर खाल्ला किंवा मग सकाळी उपाशीपोटी त्याचा रस तुम्ही घेतला तरी चांगलं किंवा तो चावून चावून खाल्ल्यात तरी चांगलं कारण त्यात जे काही पौष्टिक घटक असतात ते मिळत असल्याचं सरोज दाते सांगतात.
मुलांच्या चष्माचा नंबर कमी करण्यासाठी कसा असावा आहार? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
त्वचेसाठी,सौंदर्यासाठी कढीपत्ता फायदेशीर
स्किनसाठी किंवा तुमच्या सौंदर्यासाठीही कढीपत्ता फायदेशीर आहे. कढीपत्ता मिक्सरमधून काढायचा. त्याचा रस काढायचा आणि थोडसं बेसन,2-3 थेंब लिंबूरस आणि त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल ऍड करून एकत्र केलेला पॅक चेहऱ्याला लावलास त्याच्या अनेक फायदे होऊ शकतात आणि स्किन वरचे जे डाग असतात ते रिमवू होण्याचं काम करतात, असं सरोज दाते सांगतात.