मुलांच्या चष्माचा नंबर कमी करण्यासाठी कसा असावा आहार? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपल्या मुलांचा चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून किंवा तोच नंबर स्थिर राहावा म्हणून यासाठी मुलांचं डायट कसा असावा? जाणून घ्या.
सध्या लहान मुलांमध्ये चष्मा लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामागे विविध कारणे आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांचा मोबाईल टाइमिंग जास्त झाल्यामुळे देखील त्यांना चष्मा लागत आहे. आपल्या मुलांचा चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून किंवा तोच नंबर स्थिर राहावा म्हणून यासाठी मुलांचं डायट कसा असावा? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
उत्तम आरोग्यासाठी मांसाहारही उत्तम मार्ग आहे. चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर अंड्यातलं जे पिवळं बल्क आहे ते सुद्धा मुलांच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. जे लोक मांसाहार करतात त्यांनी मुलांनाही तो आहार द्यावा. मुलांनी साधारणपणे दोन लिटर पाणी दिवसभरात प्यायला पाहिजे. तसंच कडधान्य, धान्य, नाचणी, राजगिरा याचे देखील वेगवेगळे पदार्थ मुलांना खायला देणं गरजेचं आहे, असं मठाळकर यांनी सांगितलं.
advertisement
तुम्ही जर तुमच्या मुलांना दर तीन तीन तासाच्या अंतराने वेगवेगळे पदार्थ खायला दिले तर याचा त्यांना फायदा होतो. जास्तीत जास्त नारंगी फळांचा वापर आहारात करावा. यामध्ये तुम्ही संत्रीचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस त्याचबरोबर आंब्याच्या सीझनमध्ये अंबा देखील खायला देऊ शकता. डांगराचे पराठे देखील करून तुम्ही खायला देऊ शकता. जर तुम्ही व्यवस्थित डायट फॉलो केलं तर नक्कीच याचा फायदा मुलांना होईल.
advertisement