पूर्व आशियाई देशांमध्ये लोकप्रिय असलेली बोबा ड्रिंक्स आता मुंबईतही पसंतीस उतरू लागली आहे. मात्र, बोबा म्हटलं की सहसा फळांचे फ्लेवर्स आठवतात. याच पारंपरिक संकल्पनेला थोडा वेगळा ट्विस्ट देत, ‘क्रेब ओ क्लॉक’ या कॅफेमध्ये ग्राहकांना चॉकलेट बोबा चाखायला मिळते. चॉकलेट शेकसोबत पॉपिंग बोबाचं हे कॉम्बिनेशन शहरात क्वचितच पाहायला मिळत असल्याने, तरुणाईपासून फूड लव्हर्सपर्यंत सर्वांचाच ओढा वाढतो आहे.
advertisement
या कॅफेची सुरुवात बालपणीचे मित्र जीत वाघेला आणि कार्तिक पटेल यांनी केली आहे. सामान्य ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, परवडणाऱ्या दरात दर्जेदार पदार्थ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे येथे कोणताही पदार्थ महागडा न ठेवता, चव आणि गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे.
मेन्यूमध्ये फक्त बोबाच नाही, तर कोबोची सँडविच, विविध प्रकारचे सँडविच, तिरंगा सँडविच, गार्लिक ब्रेड्सचे वेगवेगळे व्हेरायटीज, फ्राईज, पास्ता, नाचोस यांसारखे स्नॅक्सही उपलब्ध आहेत. पेयांमध्ये तेरीमिसू कोल्ड कॉफी, स्ट्रॉबेरी शेक यांसारखे पर्याय खवय्यांना आकर्षित करत आहेत.
विशेष म्हणजे, हे सर्व पदार्थ 99 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत मिळत असल्याने, विद्यार्थी आणि तरुण वर्गासाठी हा कॅफे एक परवडणारा पर्याय ठरत आहे. चव, वेगळेपण आणि बजेट यांचा मेळ साधणाऱ्या या फूड स्टोरीमुळे, कांदिवली पश्चिमेकडील चारकोप भागात ‘क्रेब ओ क्लॉक’ हे नाव हळूहळू ओळखीचं होत चाललं आहे.





