Kachya Kelichi Bhaji : थंडीच्या दिवसांत बनवा कुरकुरीत केळीची भजी, चवीला अतिशय टेस्टी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडीच्या दिवसांत गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. बटाट्याच्या भजीसोबतच कच्च्या केळीची भजी देखील अनेकांना आवडते.
अमरावती : थंडीच्या दिवसांत गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. बटाट्याच्या भजीसोबतच कच्च्या केळीची भजी देखील अनेकांना आवडते. आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आणि चवीला अप्रतिम अशी ही भजी घरी सहज करता येतात. कच्ची केळी ही फायबर, पोटॅशियम आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेली असते. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. योग्य मसाल्यांच्या संगतीने तयार केलेली कच्च्या केळीची भजी कुरकुरीत लागतात. जाणून घ्या, रेसिपी.
कच्च्या केळीची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कच्ची केळी, बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरे, धने पूड, मीठ आणि कोथिंबीर हे साहित्य लागेल.
कच्च्या केळीची भजी बनवण्याची कृती
सर्वात आधी केळी सोलून त्याचे पाहिजे त्या आकाराचे काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. नंतर कोथिंबीर टाकायची.
advertisement
नंतर मीठ आणि धने पूड टाकून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य मिक्स करून त्यात पाणी टाकून भिजवून घ्यायचे आहे. नंतर केळीचे काप त्यात भिजवून तेलात तळून घ्यावेत. कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेतली की, भजी खाण्यासाठी तयार आहे. ही भजी तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 10:14 AM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Kachya Kelichi Bhaji : थंडीच्या दिवसांत बनवा कुरकुरीत केळीची भजी, चवीला अतिशय टेस्टी, रेसिपीचा संपूर्ण Video









