मुंबईत मोजक्याच ठिकाणी असलेल्या या इराणी कॅन्टीनमध्ये शंभरहून अधिक प्रकारचे पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे, हे सर्व पदार्थ खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध असून त्यांची चव एकदम वेगळी आणि खास आहे. इथे मिळणारा बन-पाव मऊसर असून त्याला इराणी कॅफेची पारंपरिक चव जपलेली आहे. त्यानंतर इथले मशरूम सँडविच चाखले, जे भरपूर स्टफिंग आणि संतुलित मसाल्यामुळे खास वाटते. इथला बर्गर देखील चवीला उत्तम असून सर्व वयोगटातील ग्राहकांना आवडेल असा आहे. याशिवाय, येथे मिळणारे हॉट डॉग हे देखील खास आकर्षण ठरत असून पारंपरिक चवीसोबत मॉडर्न स्टाईलचा अनुभव देतात.
advertisement
नॉन-व्हेज प्रेमींसाठी इथे खास मेजवानी आहे. आम्ही इथे बोंबील फ्राय ट्राय केला, जो कुरकुरीत, ताजा आणि चवीला अप्रतिम आहे. योग्य दरात मिळणारा हा पदार्थ नक्कीच पुन्हा-पुन्हा खावा असा आहे. व्हेज खाणाऱ्यांसाठीही इथे विविध पर्याय उपलब्ध असून वेगवेगळे व्हेज फ्राय प्रकार आणि स्नॅक्स चवीला उत्कृष्ट आहेत. इथे दिला जाणारा मायो सॉस देखील खूपच चवदार असून पदार्थांची चव अधिक खुलवतो.
गोड पदार्थांच्या बाबतीतही इराणी कॅन्टीन निराश करत नाही. इथे मिळणारे चीज केक, बेक केलेले केक, कॅरमल कस्टर्ड, चॉकलेट मूस हे सर्व डेझर्ट्स चवीला अप्रतिम आहेत. तसेच पारंपरिक बन-पाव नानकटाई देखील इथे खास ओळख निर्माण करत आहे.
विंटेज इंटेरियर हेही खास आकर्षण
फक्त पदार्थच नाही, तर इराणी कॅन्टीनचे इंटेरियर हेही तेवढेच लक्ष वेधून घेणारे आहे. इराणी कॅफे म्हटलं की जसा जुना मुंबईचा विंटेज फील येतो, तसाच अनुभव इथेही मिळतो. जुन्या पद्धतीच्या खुर्च्या, पारंपरिक लाईट्स, छतावरचे पंखे आणि एकूण मांडणी पाहिली की जणू मुंबईच्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं.
इथे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे, जुन्या शैलीच्या फ्रेम्स, तसेच मुंबईच्या जुन्या काळातील दुर्मिळ फोटो लावलेले आहेत. हे सगळं मिळून इराणी कॅन्टीनला एक वेगळा, एस्थेटिक आणि विंटेज लूक देतात. खुर्च्या, टेबल्स आणि बसण्याची रचना सुद्धा आरामदायक आणि वेगळ्या पद्धतीची आहे, ज्यामुळे इथे बसून खाण्याचा अनुभव आणखी खास होतो.
एकूणच, पारंपरिक इराणी चव, आधुनिक खाद्यपदार्थांची व्हरायटी आणि जुन्या मुंबईचा विंटेज फील यांचा सुंदर संगम म्हणजे इराणी कॅन्टीन. परवडणारे दर, वेगळी चव आणि आकर्षक इंटेरियरमुळे हे ठिकाण मुंबईकरांसाठी नक्कीच एक नवं फूड डेस्टिनेशन ठरत आहे.





