Tandalachi Bhakri : प्रवासात आता खराब नाही होणार तांदळाची भाकरी, बनवा सोप्या पद्धतीनं, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तांदूळ भाकरी जास्त वेळ टिकविण्यासाठी बनवायची असेल तर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. भाकर तुटणार नाही आणि आपण 2 दिवस ठेवली तरी खराब होणार नाही.
कल्याण : तांदळाची उकड घेऊन बनवलेली भाकरी 2 दिवस तर हमखास टिकेल. भाकरी ही चुकीच्या पद्धतीत बनवली तर 4 ते 5 तासात ती कडक तरी होईल नाहीतर ओलसर होऊन लवकर खराब होते. त्यामुळे प्रवासात तांदळाची भाकरी नेण्यास खूपदा टाळतात. परंतु नाचणी, तांदूळ भाकरी जास्त वेळ टिकविण्यासाठी बनवायची असेल तर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. भाकर तुटणार नाही आणि आपण 2 दिवस ठेवली तरी खराब होणार नाही.
तांदळाची भाकरी साहित्य
तांदळाचे पीठ, पाणी, मीठ, तेल (आवश्यकतेनुसार) हे साहित्य लागेल.
तांदळाची भाकरी कृती (उकडीची पद्धत):
पाणी उकळवा: एका पातेल्यात आवश्यकतेनुसार पाणी गरम करा आणि त्यात चवीनुसार मीठ घाला. तेल गरज वाटल्यास घालावे.
पीठ घाला: पाण्याला उकळी आल्यावर, त्यात हळूहळू तांदळाचे पीठ टाका आणि एकजीव करा. उकळी येण्याआधीच पीठ टाकू नका.
advertisement
उकड काढा: मिश्रण एकत्र करून झाकण ठेवा. 2-3 मिनिटांनी गॅस बंद करा आणि उकड थोडी थंड होऊ द्या.
पीठ मळा: उकड कोमट झाल्यावर हाताला थोडे तेल किंवा पाणी लावून पीठ चांगले मळून घ्या.
भाकरी थापा: पिठाचा गोळा घ्या आणि पोळपाटावर हाताने गोल-गोल फिरवत किंवा बोटांच्या साहाय्याने भाकरी थापा. एका हातावर पीठ लावून दुसऱ्या हाताने भाकरी थापण्याची खास आगरी पद्धत आहे.
advertisement
भाकरी शेका: गरम तव्यावर भाकरी टाका. ती थोडी फुगून झाल्यावर, दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्या.
टीप:
1. मऊ भाकरीसाठी गरम पाण्याचा वापर आणि योग्य मळणे महत्त्वाचे आहे.
2. तेल टाकल्यास भाकर ओलसर होत नाही. भाजताना तव्यात चिकटत नाही.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:05 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Tandalachi Bhakri : प्रवासात आता खराब नाही होणार तांदळाची भाकरी, बनवा सोप्या पद्धतीनं, रेसिपीचा संपूर्ण Video








