advertisement

अहिल्यानगर हादरले! कीर्तनकाराचा मुलीला पक्कडने चटके देत अमानुष अत्याचार, भोंदू गुंजाळ महाराजाला ठोकल्या बेड्या

Last Updated:

'मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,' अशी धमकी देऊन त्याने तिला दहशतीत ठेवले होते

News18
News18
अहिल्यानगर: वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना पारनेर तासुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणी कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका 17 वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर पीडितेला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
समोरल आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते, तर पीडितेचा भाऊ त्याच्याच संस्थेत कार्यरत होता. याच विश्वासाचा फायदा घेत नराधम यशवंतने 2021 पासून पीडितेवर वारंवार अत्याचार केले. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता 'मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,' अशी धमकी देऊन त्याने तिला दहशतीत ठेवले होते. पीडिता घरी एकटी असली की आरोपी हा वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत असे.
advertisement

लोखंडी पक्कड गरम करून दिले चटके

काही दिवसांपूर्वी या नराधमाने क्रूरतेचा कळस गाठला. पीडितेला फोन करून घरी बोलावले मात्र मुलीने येण्यास नकार दिला असता कुटुंबाल संपवण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला  कॉम्प्युटर रूममध्ये डांबले आणि बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर गॅसवर लोखंडी पक्कड गरम करून तिच्या शरीरावर अमानुषपणे चटके दिले. या भीषण छळानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. 14 मार्च रोजी पीडितेच्या भावाने तिची गंभीर अवस्था पाहून तिला विश्वासात घेतले असता, पाच वर्षांपासून सुरू असलेला हा वेदनादायी आणि संतापजनक समोर आला.
advertisement

आरोपीला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

बहीणीने हा धक्कादायक प्रकार सांगितल्यानंतर भावाने पोलीस स्थानकात धाव घेतली, पारनेर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी यशवंत थोरातला रविवारी पहाटे अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा नराधम भोंदू महाराजाला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकारानंतर गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अहिल्यानगर हादरले! कीर्तनकाराचा मुलीला पक्कडने चटके देत अमानुष अत्याचार, भोंदू गुंजाळ महाराजाला ठोकल्या बेड्या
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement