एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Cooking Gas Cylinders: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून नागरिक मोठ्या प्रमाणावर सिलिंडर बुकिंगसाठी डिजिटल अॅप्सकडे वळत आहेत.
मुंबई: मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेटलेली ठिणगी आता थेट भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. इंधन आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण होताच देशभरात सिलिंडर बुकिंगसाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या संकटकाळात भारतीयांनी चॅट जीपीटी (ChatGPT) सारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञानाला बाजूला सारून सरकारी गॅस बुकिंग ॲपला डोक्यावर घेतले आहे.
एआय (AI) पेक्षा 'भाकरी' महत्त्वाची!
गेल्या काही दिवसांपासून 'Google Play Store' वर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतोय. नेहमी अव्वल स्थानी असणाऱ्या ChatGPT ला मागे टाकत 'IndianOil ONE' हे ॲप फ्री डाऊनलोड चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. जेव्हा पोटाचा प्रश्न येतो, तेव्हा अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा दैनंदिन गरजेच्या सेवांना लोक प्राधान्य देतात, हेच यावरून स्पष्ट झाले आहे. केवळ इंडियन ऑईलच नाही, तर 'HP Pay' आणि 'HelloBPCL' या ॲप्सच्या डाऊनलोडमध्येही मोठी वाढ झाली आहे.
advertisement
आयटी कंपन्यांवरही ओढवली 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ
या टंचाईचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर बड्या आयटी कंपन्यांनाही बसला आहे.
इन्फोसिस (Infosys): बेंगळुरू, पुणे आणि चेन्नई येथील कॅम्पसमध्ये गॅसअभावी फूड कोर्टमधील अनेक पदार्थ मिळणे बंद झाले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क 'घरून डबा आणण्याचा' सल्ला दिला आहे.
HCLTech: चेन्नईमध्ये तर परिस्थिती इतकी बिकट झाली की, कॅफेटेरिया चालकांनी हात वर केले. परिणामी, कंपनीने कर्मचाऱ्यांना १२ आणि 13 मार्च रोजी घरूनच काम (WFH) करण्यास सांगितले आहे.
advertisement
नेमकी भीती काय?
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियातून होणारा पुरवठा खंडित होण्याची चिन्हं आहेत. खबरदारी म्हणून भारत सरकारने घरगुती एलपीजी आणि सीएनजी उत्पादनासाठी गॅस वळवला आहे. मात्र, यामुळे व्यावसायिक वापराच्या (Commercial) गॅसवर निर्बंध आले असून हॉटेल आणि ऑफिसमधील कॅन्टीनवर त्याचे थेट परिणाम दिसत आहेत.
सध्या नागरिक आपलं सिलिंडर बुक करण्यासाठी आणि डिलिव्हरी स्टेटस तपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल ॲप्सचा आधार घेत आहेत. 'वेळेवर गॅस मिळेल का?' या चिंतेपोटीच हे सर्व ॲप्स सध्या भारतात ट्रेंडिंगमध्ये आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 9:04 PM IST
मराठी बातम्या/मनी/
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!








