advertisement

"स्वतःला चोर बनवण्यासाठी आलात?", 'भाऊचा धक्का'वर रितेशचा राग अनावर, प्रभूला झाप-झाप झापलं, पुढे जे झालं...

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: दर आठवड्याला घरातील स्पर्धक राडे करतात आणि 'भाऊचा धक्का'वर रितेश भाऊ त्यांची चांगलीच शाळा घेतात. या आठवड्यातही तसंच काहीसं पाहायला मिळालं.

News18
News18
मुंबई: बिग बॉसचं घर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते घरातील सदस्यांमधील हाय व्होल्टेज ड्रामा, कडाक्याची भांडणं आणि मजामस्ती. यंदाचं बिग बॉस मराठीचं पर्वही असंच तुफान गाजतंय. प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दर आठवड्याला घरातील स्पर्धक राडे करतात आणि 'भाऊचा धक्का'वर रितेश भाऊ त्यांची चांगलीच शाळा घेतात. या आठवड्यातही तसंच काहीसं पाहायला मिळालं.
कालच्या 'भाऊचा धक्का'ची सुरुवात अतिशय मजामस्तीने झाली, मात्र त्यानंतर रितेशने सर्वांचाच समाचार घेतला. यावेळी रितेशचा रुद्रावतार पाहायला मिळाला. घरामध्ये सतत खोड्या करणारा प्रभू रितेशच्या निशाण्यावर आला. रितेशने प्रभूला थेट प्रश्न विचारला की, दुसऱ्यांच्या वस्तू लपवून त्यांना चोर ठरवणं ही तुमची कसली 'गेम स्ट्रॅटर्जी' आहे? बाहेरून मोठं नाव कमावून आलेल्या या मंडळींना तुम्ही इथे स्वतःला चोर सिद्ध करण्यासाठी बोलावले आहे का?
advertisement

रितेशचा रुद्रावतार पाहून प्रभू घाबरला

रितेशचा हा अवतार पाहून प्रभू चांगलाच घाबरला होता. एका एपिसोडमध्ये राखीने प्रभूला सांगितलं, तू इतरांच्या सामानातील काही सामान चोर आणि नंतर त्यावरून आपण राडा करू. या प्रकरणावर बोलताना रितेश प्रभूला म्हणाला, "प्रभू, लोकांच्या वस्तू चोरून लपवायच्या आणि समोरच्याला 'चोर' ठरवायचं, हा तुमचा गेम आहे का? ही कसली स्ट्रॅटेजी? इथे आलेली सगळी मंडळी बाहेरून मोठं नाव कमावून आली आहेत. ती इथे स्वतःला 'चोर' म्हणून घेण्यासाठी आली आहेत का?" रितेशचा हा पवित्रा पाहून प्रभूला साधं उत्तर देणंही कठीण झालं होतं.
advertisement

प्रभूच्या खेळावर प्रेक्षकांची नाराजी?

कलर्स वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही याबाबतचा प्रोमो शेअर करण्यात आला होता, यामध्ये तो प्रभूला ओरडताना दिसला. या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत रितेशच्या मताशी सहमती दर्शवली. काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, प्रभू मुद्दाम बिचारा बनून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एका युजरने लिहिलंय की, "तन्वीसोबतची मैत्री प्रभूला एक दिवस नक्कीच बुडवणार." तर प्रभूच्या चाहत्यांच्या मते, घरातील इतर हुशार सदस्य प्रभूचा फक्त वापर करून घेत आहेत.
advertisement

कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता?

आज रविवार आहे, म्हणजेच घरातून एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात रुचिता जामदार बाहेर पडल्यानंतर, या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे धोक्याच्या झोनमध्ये आहे. सोशल मीडियावरील कल आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहता, प्राजक्ताचा या आठवड्यातील प्रवास संपण्याची दाट शक्यता आहे. जर प्राजक्ता बाहेर पडली, तर 'बाल्कनी ग्रुप'मध्ये फक्त सागर कारंडे हा एकमेव धुरंधर शिल्लक राहील. त्यामुळे घराचे समीकरण पूर्णपणे बदलणार, हे निश्चित!
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"स्वतःला चोर बनवण्यासाठी आलात?", 'भाऊचा धक्का'वर रितेशचा राग अनावर, प्रभूला झाप-झाप झापलं, पुढे जे झालं...
Next Article
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी?
  • 8व्या वेतन आयोगाबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज

  • कोणाला किती फायदा?

  • या तारखेपासून मिळणार एरिअर

View All
advertisement