TRENDING:

ब्राऊनी लव्हरसाठी बेस्ट ऑप्शन, डोंबिवलीत एकाच ठिकाणी खा 6 हून अधिक प्रकार, किंमतही स्वस्त

Last Updated:

डोंबिवली हे खवय्यांसाठी आवडीचे ठिकाण आहे. तुम्ही जर ब्राऊनी लवर असाल तर डोंबिवली तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबिवली : डोंबिवली हे खवय्यांसाठी आवडीचे ठिकाण आहे. इथे तुम्हाला खूप व्हरायटीमध्ये वेगवेगळे पदार्थ हमखास मिळतील. तुम्ही जर ब्राऊनी लव्हर असाल तर डोंबिवली तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या घरडा सर्कल येथे डोंबिवलीतील ब्राऊनी बेकिंग को या शॉपमध्ये तुम्हाला 6 हून अधिक प्रकारच्या फक्त ब्राऊनी मिळतील.

advertisement

ब्राऊनी म्हंटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर फक्त चॉकलेट ब्राऊन उभी राहते. परंतु चॉकलेट ब्राऊनीहून सुद्धा अनेक प्रकार या शॉपमध्ये तुम्हाला मिळतील. यांची किंमत इथे फक्त 89 रुपयांपासून सुरू होते. ओमकार फणसे यांनी आवड म्हणून सुरुवातीला ब्राऊनी बनवायला सुरुवात केली होती. परंतु डोंबिवलीत कुठेच ब्राऊनी लव्हर्सना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्राऊनी मिळत नाहीत. याच कारणाने त्यांनी काहीतरी वेगळा बिजनेस म्हणून ब्राऊनी बेकिंग को हे शॉप सुरू केले. ते पार्टी की बर्थडे यांच्या ऑर्डर सुद्धा घेतात. किंवा कोणाला जर फक्त सिंगलपीस ब्राऊनीच हवा असेल तोही ऑनलाइन डिलिव्हरी पद्धतीने जर ते सुद्धा करतात. ब्राऊनी मेकिंग कोच वैशिष्ट्य म्हणजे इथे सगळ्या ब्राऊनी या एगलेस आणि फ्रेश असतात. 

advertisement

30 वर्षांची परंपरा, पिता-पुत्र मिळून विकतात छत्रपती संभाजीनगरमध्ये लब्दो, चव अशी की परत याल!

या ब्राऊनी बेकिंग शॉपमध्ये तुम्हाला वॉल नट ब्राऊनी, चोकोचीप ब्राऊनी, ब्राऊनी विथ आईस्क्रीम, ब्राऊनी विथ नटेला, ब्राऊनी विथ कॅरमल, प्लेन फजी ब्राऊनी, ब्राऊनी विथ वफल हे सगळे प्रकार तुम्हाला या शॉपमध्ये मिळतील आणि यांची किंमत फक्त 89 रुपयांपासून सुरू होते. इथे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट कस्टमाईज करून द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल. गणपतीच्या दिवसात सुद्धा ब्राऊनी मोदक स्पेशल ही डिश ठेवण्यात आली होती आणि याला डोंबिवलीकरांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

advertisement

'ब्राऊनी लवर अनेक जण असतात. त्यामुळे डोंबिवलीमध्ये असं कोणत्या शॉप नाही जिथे फक्त ब्राऊनी मिळते. म्हणूनच मी ब्राऊनीच स्पेशल शॉप काढण्याचा निर्णय घेतला. आता माझ्याकडे अनेक जण ब्राऊनी लव्हर आवर्जून येतात. माझ्या इथे मिळणाऱ्या सगळ्या ब्राऊनी या फ्रेश असल्यामुळे डोंबिवलीकरांच्या पसंतीचे झाले आहेत’, असे ओमकार फणसे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
ब्राऊनी लव्हरसाठी बेस्ट ऑप्शन, डोंबिवलीत एकाच ठिकाणी खा 6 हून अधिक प्रकार, किंमतही स्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल