प्रवासातील नैतिक कोंडी आणि उपाय..
जागेची अदलाबदल : तुमच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाला त्याच्या कुटुंबियांसोबत बसण्यासाठी तुम्ही तुमची जागा सोडावी का? हा एक नेहमीचा प्रश्न असतो. विशेषतः तुम्ही ती जागा खास निवडलेली असते तेव्हा किंवा त्यासाठी अतिरिक्त पैसे दिले असतात तेव्हा हा निर्णय घेणे कठीण जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या बदल्यात चांगली जागा मिळत असेल, तर तुम्ही जागा सोडू शकता. अन्यथा तुम्ही फ्लाइट अटेंडंटला बोलून यावर तोडगा काढू शकता.
advertisement
हात ठेवण्यासाठीच्या जागा वाटून घेणे : तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक प्रवाशाला एक 'आर्मरेस्ट' मिळतो आणि त्यावर मीडिया कंट्रोल्स असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सहप्रवाशासोबत नम्रपणे बोलून ही जागा वाटून घेऊ शकता. संवाद साधल्याने नेहमीच चांगला परिणाम होतो.
बोलक्या सहप्रवाशाला सामोरे जाणे : कधीकधी आपल्याला एकट्याने शांतपणे पुस्तक वाचत किंवा डुलकी काढत प्रवास करायचा असतो. अशावेळी तुमच्या शेजारी बोलका माणूस बसलेला असल्यास काय करावे? यासाठी तुम्ही डोळ्यांवर पट्टी, गाणी ऐकण्यासाठी हेडसेट वापरू शकता. तरीही समोरच्याला संकेत मिळत नसल्यास तुम्ही नम्रपणे तुमची शांत राहण्याची इच्छा व्यक्त करू शकता.
सीट मागे झुकवणे : लांबच्या प्रवासाव्यतिरिक्त सीट मागे झुकवणे शक्यतो टाळावे. पण तुम्हाला सीट मागे झुकवायचीच असेल, तर तुमच्या मागच्या प्रवाशाला नम्रपणे परवानगी विचारा. तसेच, तो जेवण करत नाहीये किंवा लॅपटॉप वापरत नाहीये, याची खात्री करा.
घाईत असताना रांगेत पुढे जाणे : कधीकधी तुम्हाला खूप घाई असते आणि रांगेत उभे राहिल्यास तुमची फ्लाईट चुकण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही रांगेतील प्रवाशांना नम्रपणे तुम्हाला पुढे जाऊ देण्याची विनंती करू शकता किंवा फ्लाइट अटेंडंटची मदत घेऊन वेळेत गेटवर पोहोचू शकता.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.