देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचं खूप मोठं योगदान होतं. दक्षिण आफ्रिकेतून बॅरिस्टर होऊन आल्यावर भारतातल्या स्वातंत्र्यचळवळीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. ते अहिंसेच्या तत्त्वाचे पुरस्कर्ते होते. स्वदेशी चळवळीला आकार देण्याचं काम महात्मा गांधी यांनी केलं. याशिवायही त्यांनी अनेक मोलाचे विचार सांगितले आहेत.
1. स्वतःचा शोध घ्यायचा असेल, तर इतरांच्या सेवेमध्ये मग्न राहा.
advertisement
2. शारीरिक शक्तीमुळे ताकद मिळत नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मिळते.
3. कमकुवत व्यक्ती क्षमा करू शकत नाहीत. क्षमा हा शक्तिवान व्यक्तींचा गुण असतो.
4. तुम्ही मला साखळ्यांमध्ये अडकवू शकता, त्रास देऊ शकता, माझ्या शरीराला नष्ट करू शकता; पण माझ्या विचारांना तुम्ही कधीच कैद करून ठेवू शकत नाही.
5. ध्येयापर्यंत पोहोचणं गौरवास्पद नसून, त्यासाठी कष्ट घेणं गौरवास्पद असतं.
6. स्वतःची चूक स्वीकारणं हे केर काढण्यासारखं असतं. यामुळे जमिनीवरचा केर-कचरा साफ होतो आणि जमीन स्वच्छ होते.
7. सोनं आणि चांदीचे तुकडे नव्हे, तर उत्तम आरोग्य हेच खरं धन असतं.
8. तुम्ही ज्याचा विचार करता, जे बोलता आणि जे करता ते सुसंवादी असेल, तर त्यातून आनंद मिळेल.
9. आत्ता तुम्ही काय करताय, यावरच तुमचं भविष्य अवलंबून असेल.
10. एक चांगला माणूस प्रत्येक सजीवाचा मित्र असतो.
11. विश्वासाला नेहमी तर्काच्या तराजूत तोलायचं असतं. जेव्हा विश्वास आंधळा होतो तेव्हा तो मरून जातो.
12. थोडासा अभ्यास अनेक उपदेशांपेक्षा चांगला असतो.
13. चुकीच्या कृत्याची घृणा करा; पण चूक करणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करा.
14. मनुष्य त्याच्या विचारांपासून तयार होतो. तो जसा विचार करतो, तसा बनतो.
15. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि तो पाळायचा नाही हा खोटेपणा असतो.
सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, कोणालाही त्रास देऊ नका, असे अनेक लाखमोलाचे संदेश महात्मा गांधी यांनी लोकांना दिले आहेत. माणुसकी जपणाऱ्या या काही विचारांचं पालन केलं, तरी आयुष्याची दिशा नक्की बदलू शकेल.