मुंबई - सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारात खरेदीसाठी गर्दीही होताना दिसत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने कॉटन फॅब्रिकपासून ते डिजिटल प्रिंटिंग आणि मिरर वर्कपासून बनवलेला कुर्ता घ्यायचा असेल, पुरुषांकरिता लेटेस्ट कुर्त्यांचे बेस्ट कलेक्शन तुम्हाला पाहायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
मुंबईतील नाटको मार्केट येथे हे सर्व फुल स्लीव्ह कुर्ते, अतिशय मऊ फॅब्रिकपासून बनवलेले स्टायलिश आणि ट्रेंडी कॉटन कुर्ते पाहायला मिळतील. तुम्ही अगदी आरामात बराच काळ घालू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आकार, रंग आणि साईजही इथे उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते निवडू शकता. अगदी 800 रुपयांपासून हे कुर्ते पाहायला मिळतील.
advertisement
जेव्हा पुरुषांच्या कपड्यांचा विचार केला जातो, तेव्हा फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल रंगछटा फार चर्चेत असतात. अशाप्रकारे, जर तुम्ही या दिवाळीत भाऊबीजेनिमित्त आकर्षक कुर्ता शोधत असाल तर ते अंधेरी मार्केटमध्ये 800/- रुपयांपासून हे कुर्ती उपलब्ध आहेत. यामधे वेगवेगळे कलेक्शन बघायला मिळते आणि प्रत्येक कुर्त्याची ही वेगवेगळी खासियत आहे.
कॉटन कुर्ता याची खासियत अशी आहे की, स्टाईल आणि मिनिमलिझमचे हे अतुलनिय मिश्रण आहे. हा एक ट्रेंड सेटिंग कुर्ता आहे. यामध्ये ही बरेच डार्क आणि लाईट कलर मिळतात. तसेच याची किंमत ही 500 रुपयांना आहे. तसेच फॅन्सी पेस्टल्स पिंक हँडक्राफ्टेड कॉटन कुर्ता हे पारंपारिक कुर्त्याचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यामध्ये वेगवेगळे डिजिटल प्रिंटिंगनुसार या कुर्त्याना जरा वेगळाच लूक येतो. याची किंमत ही 800 रुपयांना आहे.
तसेच प्युअर चिकनकारी कॉटन कुर्ता यामधे लाईट प्रकारचे रंग जास्त आढळून येतात. यामध्ये अगदी रेखीव वर्किंग केले असून हा कुर्ता ऑल टाइम फेवरेट होऊ शकतो. डेनिम जीन्ससह तो अधिक चांगला दिसतो. याची किंमत ही 500 रुपयांपासून आहे.
तसेच प्रिंटेड सुपर कुर्ता पुरुषांसाठी हा सर्वोत्तम कुर्त्यांपैकी एक आहे. मँडरीन कॉलरपासून ते आकर्षक ट्रायबल प्रिंटपर्यंत सर्व काही या कुर्त्यावर आहे. हा फारच कम्फर्टेबल आहे. याची किंमत ही 800 रुपयांना आहे. त्यामुळे असे बरेच कुर्ती कलेक्शन येथे पाहायला मिळतात. तर मग तुम्हालाही अशाप्रकारचे कुर्ते हवे असतील तर तुम्हीही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.