TRENDING:

नव्या माठातील पाणी थंड का होत नाही? त्यामागे आहेत 'ही' 3 कारणं, करा 'हे' 2 उपाय; पाणी मिळेल थंडगार

Last Updated:

उन्हाळ्यात माठाचं थंड पाणी आरोग्यासाठी उत्तम असतं. मात्र नवीन माठ लगेच थंड पाणी देत नाही, कारण त्याच्या भिंतींमधील लहान छिद्र अद्याप सक्रिय नसतात. माठातून पाण्याचे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उन्हाळा सुरु झाला आहे आणि या गरमीपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय शोधत आहेत. पण या वातावरणात बऱ्याच लोकांना फ्रिजमधील थंड पाणी प्यायला आवडत नाही. खरं तर ते आरोग्यासाठीही चांगलं नसतं. जेव्हा आपण नवीन माठ आणतो आणि त्यात लगेच पाणी भरून पितो, तेव्हा ते पाणी थंड लागत नाही. यामागे काय कारण आहे, हे आपण आता समजून घेऊया...
Clay pot
Clay pot
advertisement

माठाचे छिद्रं पूर्णपणे उघडलेले नसतात : माठ थंड होतो कारण त्याच्या माठाच्या मातीला बारीक छिद्र असतात. या छिद्रांमधून पाणी हळू हळू बाहेर येतं आणि त्याचं बाष्पीभवन होतं. याच बाष्पीभवनाच्या क्रियेमुळे माठातील पाणी थंड होतं. पण नवीन माठ पूर्णपणे कोरडा नसल्यामुळे आणि त्याची छिद्रं व्यवस्थित उघडलेली नसल्यामुळे लगेच पाणी थंड होत नाही.

advertisement

मातीतील ओलावा आणि पाण्याचे संतुलन : नवीन माठातील मातीमध्ये अजून थोडा ओलावा असतो. त्यामुळे ती लवकर पाणी शोषून घेत नाही आणि बाष्पीभवनाची क्रिया हळू होते. जुन्या किंवा वापरलेल्या माठामध्ये मातीची पातळी संतुलित होते आणि तो अधिक चांगल्या प्रकारे काम करतो.

माठ तयार नसतो : जेव्हा नवीन माठ काही दिवस पाण्यात भिजवला जातो किंवा तो काही वेळा वापरला जातो, तेव्हा तो चांगला तयार होतो. याचा अर्थ त्याच्या मातीचं पाण्याशी योग्य संतुलन तयार होतं आणि छिद्रांमधून बाष्पीभवन अधिक चांगल्या प्रकारे होतं.

advertisement

उपाय काय करायचा?

  1. नवीन माठ आणल्यावर लगेच त्यात पिण्याचे पाणी भरू नका. पहिल्यांदा तो 1-2 दिवस पाण्याने भरून ठेवा आणि नंतर ते पाणी फेकून द्या.
  2. माठ सावलीत सुकू द्या आणि मग पुन्हा पाणी भरा. असं 2-3 वेळा केल्यावर माठातील पाणी थंड व्हायला लागेल.

हे ही वाचा : प्लास्टिक की मेटल... कोणता कूलर जास्त गारवा देतो? खरेदी करण्यापूर्वी लक्षात घ्या तज्ज्ञांना 'हा' सल्ला  

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व
सर्व पहा

हे ही वाचा : उन्हाळ्यात आरोग्य राखायचंय? तर आहारात घ्या 'ही' पांढरी वस्तू; पोट राहील थंड अन् त्वचेवर येईल तेज

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नव्या माठातील पाणी थंड का होत नाही? त्यामागे आहेत 'ही' 3 कारणं, करा 'हे' 2 उपाय; पाणी मिळेल थंडगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल