TRENDING:

फॅशनपासून पारंपारिक वस्तुंपर्यंत सर्व काही, एकाच छताखाली भरलंय 'या'ठिकाणी भव्यदिव्य एक्झिहिबिशन

Last Updated:

वसई येथील वर्तक हॉलमध्ये ‘यूनिवर्सल ट्रेड एक्सपो’ अंतर्गत ‘श्री सखी एक्सहिबिशन’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 11 डिसेंबरपासून 14 डिसेंबर 2025 पर्यंत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वसई येथील वर्तक हॉलमध्ये ‘यूनिवर्सल ट्रेड एक्सपो’ अंतर्गत ‘श्री सखी एक्सहिबिशन’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 11 डिसेंबरपासून 14 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून फॅशन, लाइफस्टाइल, हँडक्राफ्टेड आणि पारंपरिक ते ट्रेंडी वस्तूंचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळणार आहे.
advertisement

या प्रदर्शनात भेटवस्तू, कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तूंसह विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास आकर्षण ठरत आहेत साड्यांचे स्टॉल, जिथे पैठणी, कॉटन, लिनन, साउथ सिल्क अशा विविध प्रकारच्या साड्या अगदी 650 रुपयांपासून 2000 पर्यंत उपलब्ध आहेत. प्रदर्शनात कॉटन, लिनन, खादी, बटिक यांसारखी ड्रेस मटेरियल 650 ते 1500 पर्यंत मिळत आहेत. 1 ग्रॅमची ज्वेलरीही खास आकर्षण ठरत असून त्यामध्ये नॅकलेस, इयररिंग्स, ब्रेसलेट, रिंग्स आदींचा समावेश आहे. या दागिन्यांची किंमत 500 पासून सुरू होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीच्या दरात वाढ, गुळ आणि आल्याला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा अपडेट
सर्व पहा

कोकणातील हस्तकलेच्या वस्तूंना तसेच होम डेकॉरच्या आयटम्सना येथे विशेष स्थान आहे. हैंडमेड वस्तूही 300 पासून ते पाच 3000 पर्यंत उपलब्ध आहेत. प्रदर्शनात कॉटन टॉप्स फक्त 500 रुपयांचे 2 अशा विशेष ऑफरमध्ये उपलब्ध आहेत. खाद्यप्रेमींसाठी प्रीमियम क्वालिटीचे काजू, बदाम, पिस्ता यासह इतर अनेक दर्जेदार ड्राय फ्रूट्सही येथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. एकाच ठिकाणी विविध संस्कृतींचा आणि कलेचा संगम अनुभवायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फॅशनपासून पारंपारिक वस्तुंपर्यंत सर्व काही, एकाच छताखाली भरलंय 'या'ठिकाणी भव्यदिव्य एक्झिहिबिशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल