ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. यातील अँटीऑक्सिडंट शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून, ग्रीन टीमध्ये असलेले कॅटचिन नावाचे तत्व आढळते. हा घटक शरीरातील चरबी कमी करण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करतो.
ग्रीन टी पिण्याचे फायदे :
मेटाबॉलिज्म वाढवते.
शरीरातील फॅट्स कमी करते.
ग्रीन टीमध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट्स आढळतात.
advertisement
भूक नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरते.
ग्रीन टीमध्ये कॅफीन असते जे थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करते.
ग्रीन कॉफी हा सध्या नवा ट्रेंड आला आहे. यामध्ये कॉफीच्या बीन्स भाजल्या जात नाहीत त्यामुळे त्यात असलेले क्लोरोजेनिक ॲसिड टिकून राहते. असं मानलं जात की हे ऍसिड वजन कमी करण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे ऊर्जा देखील मिळते.
ग्रीन कॉफीचे फायदे :
ग्रीन कॉफी ही शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते.
ग्रीन कॉफी ही क्लोरोजेनिक ऍसिडने भरपूर असते.
ग्रीन कॉफीमध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट्स असतात.
वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?
ग्रीन टी आणि ग्रीन कॉफी दोन्ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र दोघांमध्ये थोडा फार फरक आहे. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असते जे चयापचय वाढवण्यासाठी अधिक प्रभावी ठरते तर ग्रीन कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते जे ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तेव्हा जर तुम्हाला पचनक्रिया चांगली ठेवायची असेल तर ग्रीन टी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते तर जर तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करायची असेल तर ग्रीन कॉफी उपयोगी ठरू शकते.
ग्रीन ती किंवा ग्रीन कॉफी ही आरोग्यासाठी चांगली असली तरी तिचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. कारण यात कॅफिन जास्त असते त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन टी किंवा कॉफीवर अवलंबून राहू नका आणि नियमित व्यायाम करा तसेच आहार संतुलित ठेवा.