जाणून घेऊयात ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी यापैकी वजन कमी करण्यात काय फायदेशीर ठरू शकतं
हे सुद्धा वाचा : Tulsi Tea: स्वस्थ राहायचं आहे मग प्या ‘हा’ चहा; होतील अनेक फायदे
advertisement
ग्रीन टी(Green Tea)
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स (कॅटेचिन्स) भरपूर असतात, जे मेटाबॉलिझम वाढवून अतिरिक्त चरबी जाळण्यात मदत करतात. यात कॅफिनही असते जे उर्जेचा पुरवठा करते. कॅटेचिन्स आणि कॅफिनमुळे भूक कमी होते आणि पाण्यामुळे पोट भरलेलं वाटतं. ग्रीन टी पचनक्रियेला सुधारून पोटातला जडपणा कमी करते. पचन सुधारल्यावर पोट हलकं वाटतं.याशिवाय ग्रीन टीमध्ये दूध किंवा साखर नसल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज जात नाहीत.
ब्लॅक कॉफी (Black Coffee)
ब्लॅक कॉफीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे ती लो-कॅलोरी ड्रिंक आहे.त्यामुळे ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन वाढत नाही. कॅफेनमुळे मेटाबॉलिझम वाढून शरीरातली चरबी वेगाने जळायला मदत होते. कॅफेन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे उर्जेचा पुरवठा होतो आणि शारीरिक व मानसिक कार्यक्षमता सुधारते. कॅफेन मेंदूतील न्यूरोट्रांसमिटर्स सक्रिय ठेवते, ज्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते.डिमेन्शिया, अल्झायमर, आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांचा धोका कमी होतो. ब्लॅक कॉफीमध्ये पॉलीफेनॉल्स, हायड्रोक्सीकिनॅमिक अॅसिड्स, आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढतात.त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्लॅक कॉफी लिव्हरवर सकारात्मक परिणाम करते आणि लिव्हर सिरॉसिस, फॅटी लिव्हर, आणि कॅन्सरसारख्या समस्या होण्याचा धोका कमी करते. कॅफेनमुळे भूक नियंत्रणात राहते.
ग्रीन कॉफी (Green Coffee)
गेल्या काही वर्षांपासून वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी चर्चेत आहे. यामध्ये कॉफीच्या बिया भाजल्या जात नाहीत त्यामुळे त्यात असलेले क्लोरोजेनिक ॲसिड टिकून राहते जे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रीन कॉफीत चांगल्या प्रमाणात क्लोरोजेनिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. वजन कमी करण्यापेक्षा डायबिटीस कमी करण्यात ग्रीन कॉफी जास्त फायद्याची ठरते.