बंडू महादेव शिंदे रा.भोई गल्ली शुक्रवार पेठ सोलापूर येथे साखरहार बनविण्याचे काम करत आहेत. या कारखान्यात 50 किलो वजनाचे सुमारे 400 किलो साखरेचे हार तयार केले जात आहेत. सुरुवातीला चांगल्या प्रकारचा पाक बनविला जातो. पाक तयार झाल्यानंतर साखरगाठीच्या वेगवेगळ्या साच्यामध्ये तो पाक ओतून त्यामध्ये एक बारीक दोरी टाकली जाते. पाक घट्ट झाल्यानंतर साचा उघडल्यावर ही साखरगाठ तयार होते. छोट्या साखरगाठीपासून ते पाच किलोंपर्यंत साखरगाठी बनविल्या जातात. गेल्या चार पिढ्यांपासून साखरहार तयार करण्याची परंपरा आहे.
advertisement
सोन्याच्या दरात मोठी वाढ, पण कारण काय? आताच खरेदी करायचं की पाहायची वाट?
सोलापुरात साखरहार निर्मितीची मोठी बाजारपेठ आहे. सोलापूरच्या साखरहारांना महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणातून मागणी असते. गुढीपाडवाचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा साखरहारांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा साखरहार महागल्याने जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. तर या साखरहार विक्रीच्या माध्यमातून एका महिन्यात 25 लाख रुपयेपर्यंतची उलाढाल होत असल्याची माहिती साखरहार व्यापारी बंडू शिंदे यांनी दिली आहे.