चिकट केसांपासून मुक्तता मिळवण्यासाठी, केसांची काळजी घेणारी उत्पादनं वापरणं आवश्यक आहे. यामुळे टाळूची खोलवर स्वच्छता होते आणि केसांना पोषण मिळतं. यासाठी, काही खास घरगुती मास्क केसांसाठी उत्तम ठरू शकतात.
हे मास्क केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकतात, यामुळे टाळू निरोगी राहतो आणि केस मऊ, रेशमी आणि चमकदार राहतात. जाणून घेऊया केसांच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय ठरू शकणारे खास हेअर मास्क.
advertisement
Vitamins Deficiency :पोषणाअभावी शरीराचं होतं नुकसान, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला
अंडी, लिंबू आणि दही हेअर मास्क - हा मास्क विशेषतः तेलकट आणि चिकट केसांसाठी योग्य आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागात मुख्यत: प्रथिनं असतात. यामुळे केस आतून मजबूत होतात आणि केसांना पोषण मिळतं. दह्यामुळे टाळूवर थंडावा मिळतो आणि लिंबामुळे जास्तीचं तेल काढून टाकण्यास मदत होते आणि कोंड्यापासून आराम देते.
मास्क तयार करण्यासाठी - एका अंड्याचा पांढरा भाग घ्या, त्यात दोन चमचे ताजं दही आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चांगलं फेटून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा. अर्धा तास तसंच राहू द्या, नंतर सौम्य शाम्पूनं धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क वापरून पहा.
या मास्कमुळे केसांच्या मुळांमधील चिकटपणा दूर होतो, टाळू स्वच्छ राहतो आणि केसांना नैसर्गिकरित्या चमक मिळते, केस मऊ राहतात.
Cancer : शरीरातले सूक्ष्म बदल देतात कर्करोगाचे संकेत, ही माहिती नक्की वाचा
मिश्र धान्याचं पीठ, दही आणि लिंबू हेअर मास्क - हा एक नैसर्गिक डिटॉक्स मास्क आहे. यामुळे टाळू स्वच्छ राहतो आणि खोलवर पोषण मिळतं. मिश्र धान्याचं पीठामुळे (हरभरा, बाजरी, बार्ली इ.) केसांमधील घाण, तेल काढून टाकण्यास मदत होते. दही आणि लिंबामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात.
हा मास्क तयार करण्यासाठी, दोन टेबलस्पून मिश्र धान्याचं पीठ घ्या आणि त्यात दोन टेबलस्पून ताजं दही घाला आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य मिसळा आणि जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट पूर्ण केसांना लावा आणि पंचवीस मिनिटांनी धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क वापरणं फायदेशीर आहे.
हा मास्क वापरल्यानं टाळू स्वच्छ राहतो. केस मऊ होतात. या दोन्ही मास्कचा नियमित वापर केसांना रसायनमुक्त पोषण देतो आणि यामुळे केस स्वच्छ, मऊ, रेशमी होतात.
