लांबसडक आणि जाड्या केसांसाठी अनेक नैसर्गिक पर्यायही उपयुक्त आहेत. या पद्धतींपैकी एक म्हणजे आवळा
ज्याला इंडियन गुसबेरी म्हटलं जातं आणि भृंगराज यांचा वापर. आवळा आणि भृंगराज केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. हे दोन्हीही पर्याय केस निरोगी राखण्यासाठी, केस गळणं कमी करण्यासाठी आणि वाढ चांगली होण्यासाठी मदत करतात.
Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सरचा धोका ओळखा, वेळीच करा असे बदल, प्रकृतीची काळजी घ्या
advertisement
आवळा -
आवळा म्हणजे व्हिटॅमिन सी भरपूर, तसंच खनिजं आणि अमीनो आम्लही यात असतं. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि तुटण्याचा धोका कमी होऊ शकतो.
केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी, पांढऱ्या केसांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि खाज येणं आणि कोंडा यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा मदत करतो. आवळा नियमित वापरल्यानं केस जाड, मजबूत आणि चमकदार बनतात. यासाठी, आवळा तेल थोडंसं कोमट करा आणि टाळूवर हलक्या हातानं मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळतं. रात्रभर तेल तसंच राहू द्या आणि सकाळी सौम्य शाम्पूनं धुवा. आहारातही आवळा खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
Indigestion : पचनक्रिया मुजबूत तर तुम्ही तंदुरुस्त, पोटाच्या आरोग्यासाठी या डाएट टिप्सचा होईल उपयोग
भृंगराज
आयुर्वेदात भृंगराज हे केसांसाठी अमृत मानलं जातं. केसांची मुळांपासून मजबुती आणि रक्ताभिसरण वाढवून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी भृंगराज उपयुक्त आहे. यातल्या प्रथिनं आणि इतर पोषक घटकांमुळेकेस तुटणं आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. भृंगराज तेल थोडंसं कोमट करा आणि टाळूला लावा. पंधरा मिनिटं टाळूला हलक्या हातानं मसाज करा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. यानंतर, सौम्य शाम्पूनं धुवा. दोन तीन महिने तेल नियमित लावलं तर त्याचे चांगले परिणाम दिसतात.