TRENDING:

Hair Care : केसांच्या वाढीसाठी करुन पाहा हे उपाय, केसांच्या तक्रारी होतील गायब

Last Updated:

केसांची वाढ नीट न होणं यामागे अनेक कारणं असतात. काही आवश्यक पोषक घटकांची कमतरता हे देखील यामागचं कारण असू शकतं. केस मजबूत आणि लांब करण्यासाठी, फक्त बाहेरून तेल किंवा शाम्पू लावणं पुरेसं नाही; आतून योग्य पोषण मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. केसांच्या वाढीसाठी, विशेषतः काही जीवनसत्त्वं अत्यंत महत्त्वाची असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  केसांची वाढ एका विशिष्ट टप्प्यापर्यंत होते अशी अनेकांची तक्रार असते. काहींचे केस खूप गळतात. काहींचे केस वाढतात पण दाट होत नाहीत. अशा तक्रारी तुम्हीही ऐकल्या असतील.
News18
News18
advertisement

केसांची वाढ नीट न होणं यामागे अनेक कारणं असतात. काही आवश्यक पोषक घटकांची कमतरता हे देखील यामागचं कारण असू शकतं.

Hair Care :चिकट केसांना वैतागलात ? चिंता सोडा, हेअरमास्क वापरा, केस होतील मुलायम

केश तज्ज्ञ जुशिया भाटिया सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. केस मजबूत आणि लांब करण्यासाठी, फक्त बाहेरून तेल किंवा शाम्पू लावणं पुरेसं नाही; आतून योग्य पोषण मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. केसांच्या वाढीसाठी, विशेषतः काही जीवनसत्त्वं अत्यंत महत्त्वाची असतात.

advertisement

व्हिटॅमिन बी 12 - व्हिटॅमिन बी 12 शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. या पेशी टाळूला ऑक्सिजन आणि पोषण देतात, केसांची मुळं मजबूत करतात आणि यामुळे केसांची वाढ होते. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. ही भरपाई करण्यासाठी, आहारात धान्य, बदाम, मांस, सीफूड आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

advertisement

Vitamins Deficiency :पोषणाअभावी शरीराचं होतं नुकसान, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

व्हिटॅमिन डी - 'व्हिटॅमिन डी' ला 'सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात. नवीन केसांच्या पेशी तयार करण्यासाठी याची मदत होते आणि यामुळे टाळूचं आरोग्य चांगलं राहतं. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस गळणं किंवा पातळ होणं असे प्रकार होऊ शकतात. यासाठी, दररोज सकाळी काही वेळ कोवळ्या उन्हात थांबा. आहारात मशरूम, सॅल्मन किंवा ट्यूना मासे आणि अंड्यातील पिवळ बलक खा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

व्हिटॅमिन ई - व्हिटॅमिन ई हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे, यामुळे टाळूमधे रक्ताभिसरण वाढतं आणि केसांच्या वाढीला मदत होते. यासाठी सूर्यफूल तेल, बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया आणि हिरव्या पालेभाज्या खा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केसांच्या वाढीसाठी करुन पाहा हे उपाय, केसांच्या तक्रारी होतील गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल