दीर्घकाळ थंड पाण्यात हात घातल्याने त्वचा कोरडी होऊ शकते त्वचेला भेगा पडू शकतात. तसेच सर्दी, खोकला किंवा ताप यांसारख्या त्रासांचाही धोका वाढतो. पण काळजी करण्याची गरज नाही. काही सोपे आणि स्वस्त उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही भांडी घासण्याचे काम सहज करू शकता आणि हातांवर थंडीचा परिणामही होणार नाही.
हिवाळ्यात ही ट्रिक तुमच्या हातांना थंड पाण्यापासून वाचवेल
advertisement
हिवाळ्यात तुमच्या हातांना थंड पाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला सतत गिझर लावण्याची किंवा महागडी मशीन खरेदी करण्याची गरज नाही. फक्त एक छोटीशी वस्तू, म्हणजेच डिशवॉशिंग ग्लव्स तुमचे काम सोपे करू शकतात. या ट्रिकमुळे तुमचे हात तर उबदार आणि सुरक्षित राहतीलच. त्याचसोबत भांडी घासण्याचे कामही लवकर आणि आरामदायक होईल.
हिवाळ्यात भांडी घासतांना सर्वात मोठी भीती हीच असते की हात पाण्यात राहतील आणि लगेच थंडीचा परिणाम जाणवेल. या समस्येचा उपाय म्हणजे डिशवॉशिंग ग्लव्स. हे ग्लव्स खास या कामासाठी तयार केलेले असतात. तुम्ही ग्लव्स घालून भांडी घासाल, तर हात पाण्यात घातले तरी पाणी थेट त्वचेला लागत नाही. याचा अर्थ असा की थंड पाण्याचा हातांवर परिणाम होणार नाही आणि तुम्ही आरामात भांडी घासू शकाल.
डिशवॉशिंग ग्लव्सचा वापर करण्याचे फायदे..
डिशवॉशिंग ग्लव्सचा वापर करण्याचे फायदे..
हातांची सुरक्षा आणि आरोग्य : थंड पाण्यात सतत हात घातल्याने हात बधीर झाल्यासारखे वाटतात आणि त्वचेवरही समस्या निर्माण होऊ शकतात. सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका देखील वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात डिशवॉशिंग ग्लव्सचा वापर करणे खूप आवश्यक आहे. बाजारात आणि ऑनलाइन सहजपणे हे ग्लव्स उपलब्ध होतात आणि त्यांची किंमतही जास्त नसते.
भांडी घासणे होईल सोपे : आजकाल रबर किंवा सिलिकॉनचे डिशवॉशिंग ग्लव्स उपलब्ध आहेत. यामध्ये जाडी आणि आतल्या लाइनिंगनुसार वेगवेगळे पर्याय मिळतात. काही ग्लव्स आतून कापसाच्या अस्तरासह येतात, जे हातांना अधिक उबदार आणि सुरक्षित ठेवतात. योग्य साइजचे ग्लव्स निवडणेही महत्त्वाचे आहे, जेणेकरून हातांची पकड व्यवस्थित राहील आणि भांडी निसटण्याची भीती राहणार नाही.
जर तुम्ही रोज भांडी घासत असाल, तर ही छोटीशी गुंतवणूक तुमचे काम खूप सोपे करू शकते. ग्लव्स घालून भांडी घासल्यास हात थंड पाण्याने गोठणार नाहीत, त्वचा सुरक्षित राहील आणि भांडीही पटकन स्वच्छ होतील. या पद्धतीने काम केल्याने केवळ वेळ वाचत नाही तर हिवाळ्यात आरोग्याचीही काळजी घेतली जाते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
