घर, कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमधे महिलांना अनेकदा थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी, शरीराला चांगली ऊर्जा मिळावी यासाठी खजुरातली नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज, ग्लुकोज ज्यात भरपूर असते याचा उपयोग होतो जेणेकरुन शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं आणि महिलांमधे आढळणारा अशक्तपणा टाळता येतो.
Menstruation: PMS नं हैराण ? पाळीचे दिवस सुलभ करण्यासाठीच्या हेल्थ टिप्स
advertisement
हाडांची मजबुती - पुरुषांपेक्षा महिलांना ऑस्टियोपोरोसिसचा धोका जास्त असतो. यात हाडं कमकुवत, ठिसूळ होतात. खजुरात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन के सारखे घटक असतात, हाडांच्या आरोग्यासाठी हे घटक आवश्यक असतात. दररोज खजूर खाल्ल्यानं हाडांची घनता टिकून राहण्यास मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी वरदान - खजुरामधले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीमुळे त्वचेची लवचिकता टिकून ठेवता येते आणि सुरकुत्या कमी होतात. यातले अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचं संरक्षण करतात. याव्यतिरिक्त, लोह आणि बी जीवनसत्त्वामुळे केस गळणं कमी होतं, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात.
निरोगी पचनसंस्था - खजूर हे फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, यामुळे पचनाला मदत होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. यामुळे आतड्यांमधे निरोगी बॅक्टेरियांना प्रोत्साहन देऊन पचनसंस्था मजबूत होते, त्यामुळे पोटाच्या समस्या टाळता येतात.
Metabolism: बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम ओळखा, ही योगासनं करायला सुरुवात करा
हार्मोनल बॅलन्स - खजुरामधील व्हिटॅमिन बी6 आणि मॅग्नेशियममुळे हार्मोनल बॅलन्स राखण्यास मदत होते. ज्यामुळे पीएमएसची लक्षणं कमी होतात. यामुळे मूड चांगला राहतो आणि सेरोटोनिनसारख्या न्यूरोट्रांसमीटरना वाढवून ताण कमी करता येतो.
दररोज दोन-चार खजूर खाणं पुरेसं आहे. खजूर दुधासोबतही खाऊ शकतात. मधुमेही आणि गर्भवती महिलांनी आहारात खजूर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
