यामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी अनेक योगासनं उपयुक्त आहेत. अर्धचक्रासन हे त्यातलंच एक आसन आहे. अर्धचक्रासन म्हणजे अर्धवर्तुळाकार. हे आसन करताना, शरीर अर्ध्या चाकासारखे दिसतं. इंग्रजीत याला हाफ व्हील पोज म्हणतात. हे आसन लठ्ठपणानं ग्रस्त असलेल्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
Metabolism : चयापचय वाढवण्यासाठी योगासनं उत्तम, शरीराला मिळेल ऊर्जा आणि वजन राहिल नियंत्रणात
advertisement
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, अर्धचक्रासन या योगासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो तसंच उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी यामुळे मदत होते. या आसनात सरळ उभं राहावं लागतं आणि मागे वाकावं लागतं.
अर्धचक्रासनामुळे शरीराला ताण मिळतोच शिवाय यामुळे मणक्याची लवचिकता वाढते, स्नायू आणि पोटऱ्या मजबूत होतात आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिसवर नियंत्रण ठेवण्यास देखील यामुळे मदत होते.
High BP : रक्तदाबावर जपानी युक्ती, चालण्याचा पॅटर्न देईल ताकद, शरीर राहिल फिट
या आसनामुळे रक्ताभिसरण सुधारतं, ताण कमी होतो आणि आसन सुधारून रक्तदाब स्थिर करण्यासाठी मदत होते. फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठीही हे आसन उपयुक्त आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
पण हे करताना आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला लक्षात ठेवा. चक्कर येणं किंवा संतुलनाची समस्या असलेल्यांनी हे आसन करणं टाळावं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी ते हळूहळू आणि काळजीपूर्वक करावं. हे आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं विशेषतः महत्वाचं आहे, ज्यांना औषधं सुरु आहेत त्यांच्यासाठी ही विशेष सूचना आहे.
अर्धचक्रासनाचा नियमित सराव केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. हळूहळू आणि योग्य तंत्रानं करणं महत्वाचं आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योगासनं सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित योगासनं केल्यानं पाठीचा कणा मजबूत होतो तसंच अनेक शारीरिक समस्यांपासूनही आराम मिळतो.
