दररोज खजूर खाण्याचे फायदे पाहूया - चांगली आणि बऱ्याच काळासाठीची ऊर्जा मिळते. खजुरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वेगानं वाढत नाही. ज्यांना दिवसभर सक्रिय राहण्याची गरज आहे त्यांच्यासाठी खजूर हा एक उत्तम पर्याय आहे.
Kidney Disease: किडनी विकारांचा धोका ओळखा, शरीरातल्या बदलांकडे लक्ष द्या
आतड्यांसाठी फायदे - खजूर नैसर्गिक प्रीबायोटिक म्हणून काम करतात. यामुळे आपल्या आतड्यांमधे चांगले बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पचन सुधारतं आणि पोटाच्या समस्या कमी होतात. ज्यांना वारंवार पोटफुगी किंवा गॅसचा त्रास होतो त्यांनी खजूर नक्कीच खावेत.
advertisement
बद्धकोष्ठतेपासून आराम - खजुरात फायबरचे प्रमाण जास्त असतं. फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि आतडी स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे, सकाळी दोन खजूर खाल्ल्यानं बद्धकोष्ठता किंवा कठीण मल कमी होण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत - खजुरात अँटिऑक्सिडंट्स असतात. शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यासाठी याची मदत होते. यामुळे यकृताचं आरोग्य सुधारतं आणि सूज कमी होते.
Migraine: मायग्रेनच्या दुखण्यावर घरगुती उपाय, तीव्र डोकेदुखीतून मिळेल आराम
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीही खजूर मदत करतात. याचा अर्थ ते सौम्य डिटॉक्स फूड म्हणून काम करतात, शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी दोन खजूर खाणं सर्वोत्तम मानलं जातं. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते, पचन सुधारतं आणि शरीराला फायबर सहज शोषता येतं. आहारात कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
