TRENDING:

Flax Seeds : जवसाचे फायदे वाचून व्हाल चकित, वाचा शरीरासाठीचे पौष्टिक उपयोग

Last Updated:

सलग पंधरा दिवस कोमट पाण्यासोबत भाजलेले जवस खाल्ले तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील. जवसाच्या बियांमधे ओमेगा-३ फॅटी एसिड, फायबर, प्रथिनं आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीराचं आतून पोषण होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेक घरांमधे जवसाची चटणी हमखास केली जाते. जवस, लसूण घातलेली ही चटणी भाकरी, पोळीबरोबर चांगली लागते. जवस पचन, वजन कमी करणं, आतड्यांचं आरोग्य, संप्रेरकांचं संतुलन या सगळ्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तसंच भाजलेला जवस खाणंही शरीरासाठी फायदेशीर आहे.
News18
News18
advertisement

जवसाला सुपरफूड म्हटलं जातं. तुम्ही सलग पंधरा दिवस कोमट पाण्यासोबत भाजलेले जवस खाल्ले तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील. जवसाच्या बियांमधे ओमेगा-३ फॅटी एसिड, फायबर, प्रथिनं आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीराचं आतून पोषण होतं.

Hair Care :चिकट केसांना वैतागलात ? चिंता सोडा, हेअरमास्क वापरा, केस होतील मुलायम

advertisement

बद्धकोष्ठता आणि पचन - भाजलेल्या जवसामुळे, फायबर पचन सुधारण्यास मदत होते. दररोज जवस खाल्ल्यानं बद्धकोष्ठता दूर होते, पोट स्वच्छ राहतं आणि अपचन आणि गॅस कमी होतो. यासाठी, एक चमचा भाजलेले जवस चावून घ्या आणि नंतर कोमट पाणी प्या.

आतड्यांचं आरोग्य - दहा-पंधरा दिवस नियमितपणे जवसाचं बी खाल्ल्यानं चयापचय सुधारतं. यामुळे आतड्यांमधे चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला मदत होते आणि आतड्यांचं आरोग्य मजबूत केल्यानं उर्जेची पातळी सुधारते.

advertisement

महिलांसाठी हार्मोन्स संतुलनासाठी उपयुक्त - अळशीच्या बियांमधील म्हणजेच जवसामधील लिग्नान्स हार्मोन्स संतुलनात भूमिका बजावतात. नियमित खाल्ल्यानं अनियमित मासिक पाळी सुधारण्यास मदत होऊ शकते.

यामुळे रजोनिवृत्तीच्या मूड स्विंग, हॉट फ्लॅश या लक्षणांपासून देखील आराम मिळू शकतो. हा परिणाम हळूहळू होतो, म्हणून नियमित वापर आवश्यक आहे.

Hair Care: केसांच्या वाढीसाठी अंतर्गत पोषण महत्त्वाचं, हेअर केअर टिप्स नक्की वाचा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

वजन कमी करण्यास उपयुक्त - अळशीच्या बियांमधे भरपूर फायबर असतं, यामुळे जास्त काळ पोट भरलेलं ठेवण्यास मदत होते. यामुळे जास्त अन्न खाल्लं जात नाही. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत देखील मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी जवस खाणं अधिक फायदेशीर आहे. जवसाच्या बिया हलक्या भाजून घ्या आणि हवाबंद डब्यात साठवा. दररोज एक ते दोन चमचे घ्या. जास्त प्रमाणात जवस खाऊ नका, कारण यामुळे पोट फुगू शकतं किंवा उष्णता वाढू शकते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Flax Seeds : जवसाचे फायदे वाचून व्हाल चकित, वाचा शरीरासाठीचे पौष्टिक उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल