TRENDING:

Meditation: ताण, मानसिक आरोग्य, रक्तदाबावर रामबाण उपाय - ध्यानधारणा, प्राचीन काळापासून प्रचलित

Last Updated:

आयुष मंत्रालयाच्या पोस्टमधे, ध्यानामुळे मन कसं शांत होतं आणि आंतरिक शांती कशी अनुभवता येते याविषयीही माहिती आहे. आपण ध्यान करतो तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष केवळ आपल्या श्वासोच्छवासावर आणि आपल्या आतल्या आवाजावर असतं. यामुळे मनाच्या कोलाहलापासून दूर जाऊन स्वतःशी संवाद साधण्यासाठी मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येकाला ताण आणि चिंता सतावत असतात. कामाचा ताण, अभ्यासाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यासाठी आपला फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. त्यात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक फिटनेसही तितकाच महत्त्वाचा आहे.
News18
News18
advertisement

या सगळ्याला सामोरं जाताना मन स्वास्थ्य खूप आवश्यक आहे. याची गरज लक्षात घेऊन, आयुष मंत्रालयानं अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यात ध्यानाचं महत्त्व आणि त्याचे फायदे सांगितले आहेत.

आयुष मंत्रालयाच्या पोस्टमधे, ध्यानामुळे मन कसं शांत होतं आणि आंतरिक शांती कशी अनुभवता येते याविषयीही माहिती आहे. आपण ध्यान करतो तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष केवळ आपल्या श्वासोच्छवासावर आणि आपल्या आतल्या आवाजावर असतं. यामुळे मनाच्या कोलाहलापासून दूर जाऊन स्वतःशी संवाद साधण्यासाठी मदत होते.

advertisement

Fig : स्वादाबरोबरच आरोग्यासाठीही पौष्टिक फळ, पचनाच्या तक्रारी करेल दूर

ध्यान केल्यानं काय होतं ?

ध्यान केल्यानं मन भीती, राग, ताण आणि चिंता यासारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्यास मदत होते. दररोज ध्यान केलं तर मनात सकारात्मक विचार येतात. नकारात्मक विचार, ताण बाजूला होण्यास मदत होते. यामुळे भावनिक संतुलन साधणं शक्य होतं. आपल्या भावना समजून घेऊन त्या नियंत्रित करायला शिकतो तेव्हा  राग कमी होतो आणि आपलं मन शांत राहतं.

advertisement

एकाग्रता वाढते  - ध्यानामुळे एकाग्रता वाढवण्यास मदत होते. आजच्या काळात, प्रत्येकजण एकावेळी अनेक गोष्टींच्या विचारात व्यस्त असतो. पण, ध्यान केल्यानं आपण आपलं मन एकाच ठिकाणी स्थिर करायला शिकतो.

यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि कठीण कामं सहजपणे करू शकतो. यासोबतच, ध्यानामुले आपली इच्छाशक्ती देखील मजबूत होते. मन शांत आणि स्थिर, मजबूत असतं, तेव्हा ध्येय साध्य करण्यासाठी अधिक कठोर आणि परिश्रमपूर्वक काम करू शकतो.

advertisement

मनाला आराम मिळतो - ध्यानाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ते शरीर आणि मनाला मिळणारा आराम. दिवसभराच्या धावपळीनंतर ध्यान करण्यानं शरीर आरामदायी वाटतं आणि थकवा दूर होतो. यामुळे शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते, ज्यामुळे आपल्याला ताजंतवानं वाटतं.

Hair Care : तांदुळाचं पाणी केसांसाठी वरदान, वाचा पद्धत आणि वापराचे फायदे - तोटे

advertisement

ध्यान करण्याची पद्धत - या प्रक्रियेत डोळे बंद करणं, हळूहळू खोल श्वास घेणं आणि हळूहळू सर्व विचार शांत करणं ही एक सोपी पद्धत समाविष्ट आहे. यामुळे मन शांत झालं की, आपल्याला आनंददायी आणि स्थिर भावना अनुभवायला मिळते. आयुष मंत्रालयाच्या पोस्टमधे आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, ते म्हणजे ध्यानाची ही प्रक्रिया मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही चांगलं बनवते.

ताण आणि चिंता कमी होतात - नियमित ध्यान केल्यानं केवळ ताण आणि चिंता कमी होत नाही तर झोपेच्या समस्या देखील दूर होतात, याबद्दलच्या अभ्यासातून ही बाब अधोरेखित झाली आहे. रात्री नीट झोपू न शकणाऱ्या अनेकांसाठी ध्यान हा एक सोपा आणि प्रभावी उपाय ठरु शकतो. मन शांत असतं तेव्हा आपण लवकर झोपू शकतो आणि चांगली झोप देखील घेऊ शकतो.

उच्च रक्तदाबापासून आराम - उच्च रक्तदाबाच्या समस्या असलेले लोक ध्यानाच्या मदतीनं त्यांचं आरोग्य सुधारू शकतात. ध्यानामुळे शरीराला आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचं कार्य सुधारतं. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Meditation: ताण, मानसिक आरोग्य, रक्तदाबावर रामबाण उपाय - ध्यानधारणा, प्राचीन काळापासून प्रचलित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल