आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी जेवढे प्रयत्न होतात तितकेच प्रयत्न आपल्या पायांसाठीही घेण्याची गरज आहे. कारण पाय जितके चांगले तितकं तुमंच आरोग्य खूप चांगलं. दिवसभराच्या थकव्यानंतरही झोप लागत नसेल तर हा उपाय नक्की करा.
Skin Care : निसर्गाच्या खजिन्यानं घ्या त्वचेची काळजी, चेहरा दिसेल तजेलदार
यासाठी तज्ज्ञ नेहमीच झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात पाय बुडवण्याचा सल्ला देतात. याचे अनेक फायदे आहेत.
advertisement
पायांच्या तळव्यांमधील अॅक्युप्रेशर पॉइंट्स थेट मेंदूशी जोडलेले असतात, कोमट पाण्यात पाय बुडवल्यानं मन शांत होतं आणि झोप सुधारते. कोमट पाण्यात पाय भिजवल्यानं रक्ताभिसरण सुधारतं.
ताण कमी होतो - बराच काळ ताण जाणवत असेल आणि रात्री नीट झोपू शकत नसाल तर पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे चांगली झोप तर मिळेलच, शिवाय ताणही हळूहळू कमी होईल. गरम पाण्यात पाय भिजवल्यानं सांध्यांना आणि स्नायूंना खूप आराम मिळतो.
Health Tips : सकाळी दिवस लवकर सुरु करण्यासाठी खास टिप्स, कामं वेळेत करा, स्वत:साठी वेळ द्या
कोमट पाण्यात पाय बुडवण्यासाठी, एक स्वच्छ बादली घ्या. त्यात कोमट पाणी घाला आणि त्यात पाय बुडवा.
पाण्याचं तापमान जास्त नाही याची काळजी घ्या. पंधरा - वीस मिनिटं पाय पाण्यात ठेवा, जेणेकरून स्नायूंना आराम मिळेल आणि त्वचा मऊ होईल.