Health Tips : सकाळी दिवस लवकर सुरु करण्यासाठी खास टिप्स, कामं वेळेत करा, स्वत:साठी वेळ द्या

Last Updated:

लवकर उठून दिवस लवकर सुरु करण्याचे अनेक फायदे आहेत. काहींना कामांमुळे ते जमत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी याची सवय लावली तर तुमची बरीच काम वेळेच्या आत आवरतील आणि तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल. यासाठी डॉ. हंसा योगेंद्र यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात लवकर उठता यावं यासाठीच्या पाच सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

News18
News18
मुंबई : सकाळी लवकर उठून दिवस लवकर सुरु करण्याचे अनेक फायदे आहेत. काहींना कामांमुळे ते जमत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी याची सवय लावली तर तुमची बरीच काम वेळेच्या आत आवरतील आणि तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल.
यासाठी डॉ. हंसा योगेंद्र यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात लवकर उठता यावं यासाठीच्या पाच सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. यामुळे सकाळी कोणत्याही अलार्मशिवाय आणि कोणत्याही थकव्याशिवाय आपोआप जाग येईल.
सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावायची?
सकाळी लवकर उठण्यासाठी जबरदस्ती नाही तर योग्य नियोजन आवश्यक असल्याचं डॉ. हंसा योगेंद्र यांनी म्हटलंय.
advertisement
- सगळ्यात आधी तुम्हाला सकाळी लवकर का उठायचं आहे ते ठरवा -  योगगुरूंच्या मते, इतरांप्रमाणे करायचं म्हणून सकाळी लवकर उठत असाल तर ही सवय जास्त काळ टिकणार नाही. याशिवाय, स्वतःसाठी एक वैयक्तिक कारण ठरवा. सकाळी शांत वातावरणात ध्यान करणं, व्यायाम करणं किंवा स्वतःसाठी वेळ देणं. ही कारणं तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठण्यास प्रवृत्त करतील.
advertisement
- रिव्हर्स अलार्म तंत्राचा अवलंब करा - सकाळी लवकर उठण्याची सुरुवात रात्री होते. हंसाजी यांच्या मते,  झोपण्यापूर्वी एक तास आधी अलार्म लावा. या अलार्ममुळे झोपेची तयारी करावी लागेल. या अलार्मनंतर, फोन दूर ठेवा, लाईट मंद करा आणि मन शांत करा. यामुळे तुम्हाला दररोज वेळेवर झोपण्यास मदत होईल, चांगली झोप मिळेल आणि सकाळी कोणत्याही थकव्याशिवाय तुम्हाला जाग येऊ शकेल.
advertisement
- सकाळचं नियोजन - लवकर उठल्याबद्दल स्वतःसाठी एक छोटंसं बक्षीस निश्चित करा. सकाळी कोणती कामं करायची हे लक्षात असू द्या. काम आवरताना आवडतं गाणं ऐका तसंच काही वेळ छंद जोपासण्यासाठी द्या.
- स्लीप लूप तंत्र - दररोज शांत स्वरात जागं होण्याची सवय लावा. जसं की पक्ष्यांचे आवाज, बासरी किंवा लाटांचा आवाज असं काही.
advertisement
- वीस मिनिटांचा 'नो इनपुट झोन' - झोपेतून उठल्यानंतर, पहिली वीस मिनिटं मोबाईल, बातम्या किंवा मेसेज पाहणं टाळा. थंड पाण्यानं चेहरा धुवा, दीर्घ श्वास घ्या, थोडं स्ट्रेज करा आणि पाणी प्या.
या टिप्सची होईल मदत -
जागं झाल्यावर दहा मिनिटं सूर्यप्रकाशात किंवा नैसर्गिक प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराचं घड्याळ सुधारतं. याशिवाय सकाळी एक ग्लास पाणी लिंबू आणि थोडंसं खडे मीठ घालून प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सकाळी दिवस लवकर सुरु करण्यासाठी खास टिप्स, कामं वेळेत करा, स्वत:साठी वेळ द्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement