Exercise : शरीराला अंतर्बाह्य मजबूत करणारे व्यायाम, रोज व्यायाम करा, सुदृढ व्हा, राहा चिरतरुण

Last Updated:

वयाची तिशी ओलांडताच वय वाढतंय याची जाणीव होते. वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक संशोधनातून ही बाब सिद्ध झाली आहे. सक्रिय जीवनशैलीमुळे शरीरातील पेशी दीर्घकाळ निरोगी राहतात, हार्मोन्स संतुलित राहतात आणि मानसिक आरोग्य देखील सुधारतं. म्हातारपणाची लक्षणं लवकर दिसू नयेत असं वाटत असेल, दररोज व्यायाम हा कानमंत्र लक्षात ठेवा.

News18
News18
मुंबई : थकवा येणं, सुरकुत्या येणं, केस गळणं आणि मानसिक थकवा जाणवत असेल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. वयानुसार होणारे बदल आधीच जाणवत असतील तर व्यायाम हे त्यावरच उत्तर आहे. कारण रोजचा व्यायाम शरीर तंदुरुस्त ठेवण्यासोबतच वृद्धत्वाची प्रक्रियाही मंदावू शकतो.
वयाची तिशी ओलांडताच वय वाढतंय याची जाणीव होते. वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक संशोधनातून ही बाब सिद्ध झाली आहे. सक्रिय जीवनशैलीमुळे शरीरातील पेशी दीर्घकाळ निरोगी राहतात, हार्मोन्स संतुलित राहतात आणि मानसिक आरोग्य देखील सुधारतं. म्हातारपणाची लक्षणं लवकर दिसू नयेत असं वाटत असेल, दररोज व्यायाम हा कानमंत्र लक्षात ठेवा.
व्यायामामुळे वृद्धत्व कसे कमी होतं ?
advertisement
पेशी दुरुस्ती: व्यायामामुळे शरीरातील पेशी दुरुस्तीची प्रक्रिया वेगानं होते, ज्यामुळे वयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या येण्यास विलंब होतो.
हार्मोनल संतुलन: नियमित व्यायामामुळे कॉर्टिसोल हे तणाव संप्रेरक कमी होतं आणि ग्रोथ हार्मोन वाढतं, ज्यामुळे शरीर तरुण राहण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होतं.
advertisement
व्यायामाचे प्रकार -
- चालणं: चालणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. दररोज 7000-10,000 पावलं चालल्यानं हृदय, फुफ्फुसं आणि हाडं मजबूत होतात.
- Strength training - आठवड्यातून 2-3 वेळा हलकं वजन उचलल्यानं स्नायू मजबूत होतात आणि हाडांची घनता टिकून राहते. यामुळे हाडं ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो आणि स्नायूंचं नुकसान टाळता येतं.
advertisement
- योग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम: योगासनांमुळे शरीर लवचिक होतं आणि यामुळे मानसिक शांती मिळते.
प्राणायामानं फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि ताण कमी होतो
- पोहणं: हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामुळे सांध्यावर दबाव न येता तंदुरुस्ती वाढते. यामुळे हृदयाचं आरोग्य आणि मनःस्थिती देखील सुधारते.
advertisement
- कपालभाती आणि अनुलोम-विलोम: श्वसनाच्या व्यायामामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर चमक येते. यामुळे ताण कमी व्हायला मदत होते.
व्यायामाची योग्य वेळ आणि पद्धत - व्यायामासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे. हलक्या व्यायामानं सुरुवात करा आणि हळूहळू वेळ आणि तीव्रता वाढवा. ऋतूनुसार व्यायामाची तीव्रता बदला, उन्हाळ्यात हलका व्यायाम करा, हिवाळ्यात थोडा कठीण तीव्रतेचा व्यायाम करा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Exercise : शरीराला अंतर्बाह्य मजबूत करणारे व्यायाम, रोज व्यायाम करा, सुदृढ व्हा, राहा चिरतरुण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement