Folic Acid : फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे होतं शरीराचं गंभीर नुकसान, जाणून घ्या कारणं, उपचार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
व्हिटॅमिन बी9 म्हणजेच फॉलिक अॅसिड. शरीरात निरोगी नवीन पेशी तयार करण्यासाठी हे आवश्यक असतं. यात लाल रक्तपेशी, त्वचा आणि केस यांचा समावेश आहे. यासोबतच, ते डीएनए निर्मितीसाठी देखील चांगलं मानलं जातं.
मुंबई : शरीरासाठी प्रत्येक जीवनसत्व महत्त्वाचं असतं. प्रत्येक जीवनसत्वातले घटक शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यातलं एक म्हणजे व्हिटॅमिन बी9.
व्हिटॅमिन बी9 म्हणजेच फॉलिक अॅसिड. शरीरात निरोगी नवीन पेशी तयार करण्यासाठी हे आवश्यक असतं. यात लाल रक्तपेशी, त्वचा आणि केस यांचा समावेश आहे. यासोबतच, ते डीएनए निर्मितीसाठी देखील चांगलं मानलं जातं.
फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे थकवा, त्वचा फिकट होणं आणि श्वास घ्यायला त्रास यासारखी लक्षणं जाणवतात. यामुळे अशक्तपणा जाणवतो.
advertisement
अशक्तपणा असेल तर त्या व्यक्तीला स्मरणशक्ती कमी होणं, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं, तोंडात सूज येणं किंवा जीभेत वेदना यासारखी लक्षणं जाणवतात. यासोबतच, गर्भवती महिलांना फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. कमतरतेमुळे बाळामधे न्यूरल ट्यूब डिफेक्ट (NTPs) होण्याचा धोका वाढतो.
advertisement
न्यूरल ट्यूब दोष हे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील जन्मजात दोष आहेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात न्यूरल ट्यूब पूर्णपणे बंद झाली नाही तर हा त्रास उद्भवतो. यातला स्पायना बायफिडा हा एक प्रकार आहे. ज्यात पाठीचा कणा बंद होत नाही आणि मेंदू आणि कवटी पूर्णपणे विकसित होत नाहीत. यामागचं नेमकं कारण अद्याप अज्ञात असलं तरी, फॉलिक अॅसिडची कमतरता यामागचं कारण असू शकतं असं मानलं जातं.
advertisement
फॉलिक अॅसिडची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, बीन्स, लिंबूवर्गीय फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. यासोबत ब्रेड, तृणधान्यं, पास्ता आणि भात देखील खाऊ शकता. प्रकृती चांगली राखण्यासाठी सर्वसमावेशक आहार आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 7:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Folic Acid : फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे होतं शरीराचं गंभीर नुकसान, जाणून घ्या कारणं, उपचार


