Malasana : पचनाबरोबर सांध्यांसाठी उपयुक्त आसन, वाचा मलासनाचे फायदे

Last Updated:

मलासनाला 'गारलँड पोज' किंवा 'स्क्वॅट पोज' असंही म्हणतात. चांगल्या आरोग्यासाठी, विशेषतः सकाळी पचनाच्या दृष्टीनं मलासन करणं चांगलं. दररोज सकाळी केवळ पाच मिनिटं हे आसन करणं तब्येतीसाठी उपयुक्त आहे.

News18
News18
मुंबई : मलासन हे एक अतिशय सोपं आणि प्रभावी योगासन. या आसनाला 'गारलँड पोज' किंवा 'स्क्वॅट पोज' असंही म्हणतात. चांगल्या आरोग्यासाठी, विशेषतः सकाळी मलासन करणं चांगलं.
दररोज सकाळी केवळ पाच मिनिटं हे आसन करणं तब्येतीसाठी उपयुक्त आहे. हे आसन पचन सुलभ करण्यासाठी फायदेशीर आहेच तसंच यामुळे सांधे, स्नायूही मजबूत होतात. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ आणि डायबिटीस एज्युकेटर खुशी छाब्रा यांनी इंस्टाग्राम हँडलवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधे त्यांनी मलासनाचे काही फायदे सांगितले आहेत.
मलासन करण्यासाठी गुडघे वाकवून जमिनीवर बसा. यासाठी उठाबशा काढण्याच्या पद्धतीप्रमाणे बसा, याला स्क्वॉट पोजही म्हणतात. हे आसन कोणीही अगदी सहजपणे करू शकतं.
advertisement
मलासनाचे फायदे -
पचनसंस्था मजबूत करते - मलासनामुळे पोटाच्या अवयवांवर दबाव येतो आणि पचन सुधारतं.
आतडी स्वच्छ करण्यास उपयुक्त - या आसनामुळे आपलं मोठं आतडं योग्य स्थितीत येण्यास मदत होते, ज्यामुळे पोट स्वच्छ करणं सोपं होतं. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
कंबर आणि पाय मजबुतीसाठी आसन उपयुक्त - या आसनामुळे कंबर, मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
कंबरेचं आरोग्य सुधारतं - पोषणतज्ञांच्या मते, मलासनामुळे कंबरेला आराम मिळतो आणि विशेषतः महिलांसाठी, हे खूपच उपयुक्त आहे.
लवचिकता आणि संतुलन - या आसनानं शरीराची लवचिकता वाढते आणि शरीराचं संतुलन राखण्यास मदत होते.
advertisement
मलासन कधी आणि कसं करावं ?
सकाळी रिकाम्या पोटी मलासन करणं चांगलं. सुरुवातीला हे आसन एक-दोन मिनिटं करा आणि हळूहळू याची वेळ पाच मिनिटांपर्यंत वाढवा. चांगल्या परिणामांसाठी, मलासन करताना कोमट पाणी देखील पिऊ शकता असा सल्ला पोषणतज्ज्ञ खुशी छाब्रा यांनी दिला आहे.
मलासन केवळ पोटाशी संबंधित समस्या दूर करत नाही तर शरीराला आतून निरोगी बनवते. सकाळच्या दिनचर्येत मलासन करण्यासाठी पाच मिनिटं नक्की काढा, यामुळे पचनाच्या समस्या कमी होतील.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Malasana : पचनाबरोबर सांध्यांसाठी उपयुक्त आसन, वाचा मलासनाचे फायदे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement