Swelling : पाय-घोट्यांवर सूज येण्यामागची कारणं काय ? आहारात बदल करण्याची गरज आहे का ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
जास्त मीठ खाल्ल्यानं किंवा हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजारांमुळे पायांना सूज येते. या सर्वांव्यतिरिक्त, हे एका विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळेही सूज येते. पाहूयात लक्षणं, उपचार पद्धतीविषयीची माहिती
मुंबई : अनेकांना पाय किंवा घोट्यांवर सतत सूज येण्याचा त्रास होतो. सहसा, जास्त मीठ खाल्ल्यानं किंवा हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजारांमुळे पायांना सूज येते. या सर्वांव्यतिरिक्त, हे एका विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळेही सूज येते. प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
पाय का सुजतात?
डॉ. बर्ग यांच्या मते, शरीरात व्हिटॅमिन बी1 च्या कमतरतेमुळे देखील हे होऊ शकतं. या विशेष व्हिटॅमिनला थायमिन असंही म्हणतात. आपल्या शरीराच्या पेशींत 'सोडियम-पोटॅशियम पंप' असतो ज्यामुळे पाण्याचं संतुलन राखलं जातं.
हा पंप नीट काम करत नाही तेव्हा पेशींच्या बाहेर पाणी साचतं. त्यामुळे पायांना सूज येते. याशिवाय, साखरेची पातळी वाढली की पायांना सूज येते.
advertisement
व्हिटॅमिन बी1 चं कार्य - व्हिटॅमिन बी1 शरीरात असलेल्या अतिरिक्त साखरेचं ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे, साखरेचं योग्यरित्या विघटन होत नाही, ज्यामुळे शरीरात सूज आणि अशक्तपणा वाढतो.
व्हिटॅमिन बी1 ची कमतरता बराच काळ असेल तर त्यामुळे नसांचं नुकसान होतं आणि पायांत जळजळ, मुंग्या येणं आणि सुन्नपणा यासारख्या समस्या देखील वाढू लागतात.
advertisement
व्हिटॅमिन बी1 कसं वाढवायचं ?
यासाठी आहारात संपूर्ण धान्य, डाळी, काजू आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस डॉक्टरांनी केली आहे. याशिवाय, जास्त साखर आणि रिफाइंड मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी खाणं टाळा. सूज जास्त असेल, तर तपासणीनंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर व्हिटॅमिन बी1 सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.
advertisement
थकवा या एकाच कारणामुळे पायांना सूज येत नाही. व्हिटॅमिन बी1 च्या कमतरतेमुळे आणि साखर जास्त खाल्ल्यानंही सूज येते. सूज येत असेल तर दुर्लक्ष करु नका, वेळेवर स्वतःची चाचणी करून घ्या आणि शरीरात व्हिटॅमिन बी1 ची योग्य पातळी राखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Swelling : पाय-घोट्यांवर सूज येण्यामागची कारणं काय ? आहारात बदल करण्याची गरज आहे का ?


