Collagen : कोलेजनचं संरक्षण कसं करावं ? कशी घ्यावी त्वचेची काळजी, वाचा खास टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कोलेजन हे एक प्रथिन, त्वचेला लवचिक आणि तरुण ठेवतं, पण चुकीची जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणावांमुळे याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे वृद्धत्वाची अकाली लक्षणं दिसून येतात.
मुंबई : वयानुसार चेहऱ्यात बदल होतात तसंच त्वचेवर सुरकुत्या येतात. त्वचा सैल होते. पण त्वचा लहान वयातच सैल, निर्जीव आणि त्यावर सुरकुत्या दिसत असतील तर याचं एक प्रमुख कारण म्हणजे कोलेजनची कमतरता.
कोलेजन हे प्रथिन, त्वचेला लवचिक आणि तरुण ठेवतं, पण चुकीची जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणावांमुळे याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे वृद्धत्वाची अकाली लक्षणं दिसून येतात.
झोपेचा अभाव आणि ताण - शरीराला पुरेशी झोप मिळत नाही किंवा सतत ताण असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतं. यामुळे कोलेजनचं उत्पादन कमी होतं आणि त्वचेची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया मंदावते.
advertisement
जास्त वेळ उन्हात राहणं - तीव्र सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे त्वचेच्या वरच्या थराचं नुकसान होतं आणि कोलेजन तंतूंचं विघटन होतं. यामुळे त्वचा लवकर सैल आणि कोरडी दिसते.
प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर - गोड आणि जंक फूड खाल्ल्यानं शरीरात ग्लायकेशन प्रक्रिया होते, ज्यामुळे त्वचेचा पोत खराब होतो. सुरकुत्या आणि बारीक रेषा लवकर दिसू लागतात.
advertisement
धूम्रपान आणि अल्कोहोल - सिगरेट आणि अल्कोहोलमधले विषारी पदार्थ रक्तप्रवाहावर परिणाम करतात आणि मुक्त रॅडिकल्स तयार करतात. यामुळे कोलेजनचं जलद नुकसान होतं.
चुकीची स्किनकेअर उत्पादनं वापरणं - कठोर रसायनं असलेली उत्पादनं वापरल्यानं त्वचेचा नैसर्गिक थर जाऊन कोलेजनचं नुकसान होतं. यासाठी नेहमी सौम्य आणि त्वचारोगतज्ज्ञांनी मान्यता दिलेली उत्पादनं वापरा.
advertisement
कोलेजनची कमतरता जाणवू नये यासाठी काय करावं ?
रोज सनस्क्रीन लावा आणि त्वचेचं उन्हापासून रक्षण करा.
सात-आठ तास झोप घ्या.
ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
आहारात प्रथिनं आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ वापरा.
त्वचेची काळजी घेण्यासाठी कोलेजन वाढवणारे पदार्थ वापरा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 5:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Collagen : कोलेजनचं संरक्षण कसं करावं ? कशी घ्यावी त्वचेची काळजी, वाचा खास टिप्स