TRENDING:

Walking : उत्तम आरोग्यासाठी चाला, प्रत्येक मिनिट देईल ऊर्जा, वाचा आणखी फायदे

Last Updated:

चालण्यानं शरीरात कालांतरानं सकारात्मक बदल घडतात. चालण्यातलं प्रत्येक मिनिट खूप खास आहे. कारण दोन मिनिटं चाललं तरी रक्ताभिसरण वाढतं.फी नाही, कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नाही, कोणत्याही वयात करता येतो असा हा व्यायाम आहे. त्यामुळे चालणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा व्यायाम करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जिमला, किंवा कोणत्याही व्यायामाच्या क्लासला पैसे भरावे लागतात. पण चालणं हा तंदुरुस्त राहण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. कारण यासाठी ना पैसे लागतात ना कोणतं साधन. चालणं हा जीवनशैलीसाठी उत्तम व्यायाम का मानला जातो यासंदर्भात संशोधन करण्यात आलं. चालण्यामुळे शरीराला मिळणारे फायदे सांगणारी ही माहिती.
News18
News18
advertisement

यासंदर्भात पोषण आणि आहार तज्ज्ञ सोनिया नारंग यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या मते, दोन मिनिटं चालणं देखील शरीरासाठी लाभदायक आहे. केवळ चालण्यानं शरीरात मोठे बदल जाणवतात. चालण्यानं शरीरात कालांतरानं सकारात्मक बदल घडतात. चालण्यातलं प्रत्येक मिनिट खूप खास आहे. कारण दोन मिनिटं चाललं तरी रक्ताभिसरण वाढतं.

Intestinal Health : कमजोर आतड्यांना द्या ताकद, आहारात या घटकांचा करा समावेश, पचनसंस्था राहिल मजबूत

advertisement

रक्ताभिसरण वाढल्यानं अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. दहा  मिनिटं चालल्यानं तणावाची पातळी कमी होते.  थोडा वेळ चालल्यानंतर, ताण कमी करणारे हार्मोन्स एंडोर्फिन रिलीज होतात. त्यामुळे केवळ दहा मिनिटं चालून ताण कमी होण्यास सुरुवात होते.

पंधरा मिनिटांनंतर चालण्यानं शरीराचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. तीस मिनिटांनंतर चरबी कमी होण्यास सुरुवात होते. शरीरात साठलेली चरबी जळल्यानं वजन कमी होण्यास खूप मदत होते.

advertisement

दररोज एक तास चाललात तर कंबरेभोवती आणि पोटाभोवतीची चरबी झपाट्यानं कमी होऊ लागते, म्हणजेच कोणताही जड व्यायाम न करताही तुम्ही टोन्ड बॉडी मिळवू शकता आणि तंदुरुस्त होऊ शकता.

'जामा इंटरनॅशनल' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज फक्त दहा मिनिटं चालल्यानं अकाली मृत्यूचा धोका सात टक्क्यांनी कमी होतो. चालणं वीस मिनिटांपर्यंत वाढवलं तर हा धोका तेरा टक्क्यांनी कमी होतो आणि तीस मिनिटांनंतर हे प्रमाण सतरा टक्क्यांपर्यंत पोहोचतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या म्हणण्यानुसार दररोज तीस मिनिटं चालल्यानं हृदयरोगाचा धोका १९% कमी होऊ शकतो. जेवणानंतर पंधरा मिनिटं चालल्यानं रक्तातील साखर आणि मेंदू दोन्ही नियंत्रित राहतात. त्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका देखील कमी होऊ शकतो. जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासातून आलेलं हे निरीक्षण आहे.

advertisement

Longevity : निरोगी दीर्घायुष्यासाठी आहार कसा असावा, आयुर्वेदातल्या या टिप्सचा होईल फायदा

चालणं उत्तम कार्डिओ व्यायाम का ?

सकाळी लवकर रिकाम्या पोटी तीस ते साठ मिनिटं चालणं सर्वात प्रभावी असते. सकाळची वेळ चांगली असते, कारण तेव्हा चयापचय अधिक सक्रिय होतं आणि चरबी लवकर जाळण्यास सुरुवात होते. सर्व वयोगटांसाठी चालणं सुरक्षित आहे. चालण्यामुळे हृदयाचं आरोग्य, रक्तप्रवाह आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारते. त्यामुळे शरीरात कॅलरीची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे वजन कमी होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अनेक अडचणी आल्या, मात करत मायलेकीने केली यशस्वी केली मशरूम शेती,इतकी कमाई
सर्व पहा

फी नाही, कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नाही, कोणत्याही वयात करता येतो असा हा व्यायाम आहे. त्यामुळे चालणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा व्यायाम करू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Walking : उत्तम आरोग्यासाठी चाला, प्रत्येक मिनिट देईल ऊर्जा, वाचा आणखी फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल