TRENDING:

Health Risk Of The Day : बीपी म्हणून पिंक सॉल्ट खाताय! डॉक्टरांनी सांगितले दुष्परिणाम

Last Updated:

Pink salt Side Effects : बहुतेक लोक अशा वेळी साधं मीठ खाणं सोडून पिंक सॉल्टकडे वळतात. पण हेल्दी म्हणून पिंक सॉल्टचं सेवन किती योग्य आहे? पिक सॉल्टचेही काही दुष्परिणाम आहेत, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : हल्ली ब्लड प्रेशरची समस्या अनेकांना आहे. बीपी पेशंटना मीठ न खाण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक लोक अशा वेळी साधं मीठ खाणं सोडून पिंक सॉल्टकडे वळतात. पण हेल्दी म्हणून पिंक सॉल्टचं सेवन किती योग्य आहे? पिक सॉल्टचेही काही दुष्परिणाम आहेत, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
AI Generated Image
AI Generated Image
advertisement

मिठाचे 5 प्रकार असून आयुर्वेदिकदृष्ट्या प्रत्येक प्रकाराचं खास महत्त्व आहे. त्याचे आरोग्यासाठी विशेष फायदे असून विविध आजारांवर ते लाभदायी मानलं जातं. याबाबत हल्द्वानी येथील आयुर्वेदिक डॉक्टर विनय खुल्लर यांनी माहिती दिलीय.

Health Risk Of The Day : क्रिस्पी ब्रेड, चपाती, रोटी आवडते; मोठ्या धोक्याला देताय आमंत्रण! खाण्याआधी एक्सपर्ट काय सांगतात पाहा

advertisement

आयोडीनयुक्त मीठ हे आयोडीन समृद्ध असल्याने थायरॉईड ग्रंथीसाठी खूप फायदेशीर आहे. हे मीठ घरांमध्ये सर्वात जास्त वापरलं जातं. पण हे मिठाचंही मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्याने ताण-तणाव कमी होतो.

काळं मीठ आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यात सल्फरचं प्रमाण जास्त असल्यानं पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानलं जातं. या मिठाचं दररोज सेवन केल्यानं बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच काळं मीठ वजन कमी करण्यास, बीपी नियंत्रित करण्यास आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करतं.

advertisement

सैंधव मीठ हे सर्वोत्तम मानलं जातं. उपवासाच्या वेळीही याचं सेवन केलं जातं. या मीठामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त, तांबे यांसारखी खनिजे असतात. छातीत जळजळ, पचनाशी संबंधित समस्या, सूज आदी समस्यांपासून सैंधव मीठ खाल्ल्यानं आराम मिळतो.

Health Risk Of The Day : तांब्याच्या बाटलीतील पाणी धोकादायक, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

advertisement

गुलाबी मीठ हे हिमालयात आढळतं. हे मीठ चवीला थोडं गोड असतं. त्याचं दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. या मिठाचं सेवन केल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. ज्यामुळे डिहायड्रेशन सारख्या समस्या टाळता येतात. तसेच हे मीठ मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन्स वाढवून तणावापासून आराम देते. तसेच त्वचा स्वच्छ ठेवण्यासही मदत होते.

advertisement

समुद्रातील मीठ समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे असतात. या मीठामध्ये असणारं कॅल्शियम दात आणि हाडं मजबूत करते. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास हे मदत करते. परंतु, समुद्री मिठाचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं, अन्यथा उच्च रक्तदाब होऊ शकतो.

पिंक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट घेणं त्याचा फायदा किंवा परिणाम काही नाही. रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्टच्या फायद्याबाबत जे दावे केले जातात, त्याबाबत काही स्टडीज नाहीत ज्यातून हे फायदे स्पष्ट होतील. दुसरं म्हणजे त्यातही सोडियम आहे. म्हणजे तुम्हाला बीपी आहे म्हणून तुम्ही रॉक सॉल्ट खात आहात तर त्यानेही त्रास होणारच आहे. आणि ते त्यात मिनरल्स असल्याचं सांगितलं जातं ते इतक्या कमी प्रमाणात आहेत की त्याचा काही फायदा आहे याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत.  तसंच जे आयोडिन आपल्याला मिळणार होतं ते आयोडिनसुद्धा मिळणार नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. आदित्य देशपांडे यांनी एका पॉडकास्टवर ही माहिती दिली आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : बीपी म्हणून पिंक सॉल्ट खाताय! डॉक्टरांनी सांगितले दुष्परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल