TRENDING:

Health Tips : सलग बसून काम करु नका, कामामधे काही मिनिटांचा ब्रेक घ्या, पाहूया या छोट्या ब्रेकचं महत्त्व

Last Updated:

घरी किंवा कार्यालयात आजकाल सर्व काम संगणकावर होतं, त्यासाठी सलग बसावं लागतं. पण सलग आठ-नऊ तास बसल्यानं विविध समस्या उद्भवू शकतात. बैठं काम करणाऱ्यांची पचनक्रिया इतरांपेक्षा अधिक खराब असते. असं का होतं याची अनेक कारणं आहेत, पण आयुर्वेदात त्यावर उपाय दिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एकाच ठिकाणी तासन्तास बसून काम करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. कारण सलग काही तास बसल्यानं प्रकृतीच्या अनेक तक्रारी सुरु होतात.
News18
News18
advertisement

घरी किंवा कार्यालयात आजकाल सर्व काम संगणकावर होतं, त्यासाठी सलग बसावं लागतं. पण सलग आठ-नऊ तास बसल्यानं विविध समस्या उद्भवू शकतात. बैठं काम करणाऱ्यांची पचनक्रिया इतरांपेक्षा अधिक खराब असते. असं का होतं याची अनेक कारणं आहेत, पण आयुर्वेदात त्यावर उपाय दिले आहेत.

सततच्या कामाचे पचनसंस्थेवरील परिणाम - ऑफिसमधे बराच वेळ बसल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. लोक जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खातात किंवा आपल्या डेस्कवर बसूनच जेवतात. यामुळे शारीरिक हालचाल कमी होते आणि गॅस, पोट फुगणं, वजन वाढणं आणि भूक न लागणं यांसारख्या समस्या उद्भवतात.

advertisement

Health Tips : आंघोळीसाठी गरम पाणी घ्यायचं की गार ? आयुर्वेदात आहे उत्तर, वाचा सविस्तर माहिती

ही जीवनशैली दीर्घकाळ टिकून राहिली, तर पचनक्रिया हळूहळू मंदावते आणि अन्न पचण्याऐवजी पोटात सडू लागतं, ज्यामुळे शरीरात अनेक आजारांना निमंत्रण मिळतं.

या समस्यांवर आयुर्वेदात महत्त्वाचा सल्ला दिलाय. आयुर्वेदानुसार, केवळ चांगलं खाणं पुरेसं नाही; चांगल्या खाण्याच्या सवयी देखील महत्त्वाच्या आहेत. शांत मनानं आणि आनंदानं जेवल्यानं शरीर मजबूत होतं तसंच मानसिक ताणही कमी होतो.

advertisement

तुम्हीही ऑफिसमधे असंच करत असाल तर तर आजपासूनच काळजी घ्या. शांत मनानं जेवा आणि घास हळू हळू चावून खा. जेवण संपवण्याची घाई करू नका. सावकाश खा आणि अन्नाचा आस्वाद घ्या.

Kidney Health : डॉक्टरला न विचारता सप्लिमेंटस् घेताय ? मूत्रपिंडांवर होईल परिणाम, वेळीच ओळखा धोका

advertisement

दुसरं म्हणजं, जेवताना मोबाईल फोनपासून दूर राहा. जेवणानंतर लगेच परत बसू नका; त्याऐवजी, काही मिनिटं फिरा. दहा मिनिटं असली तरी, नक्की फेऱ्या मारा. दिवसभर खुर्चीत बसून राहू नका.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
सर्व पहा

काम करताना, दर एक-दोन तासांनी थोडं फिरा आणि भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे भरपूर पाणी प्यायला विसरू नका. याव्यतिरिक्त, तळलेले पदार्थ खाणं टाळा आणि दुपारच्या वेळी हलकं, पौष्टिक जेवण करा. हलके पदार्थ पचायला सोपे असतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सलग बसून काम करु नका, कामामधे काही मिनिटांचा ब्रेक घ्या, पाहूया या छोट्या ब्रेकचं महत्त्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल