मधुमेह, रक्तदाब हे विकार जडले की आरोग्याचं महत्त्व कळतं आणि तब्येत चांगली ठेवण्यासाठी अचानक जिममधे जाणं सुरु होतं. पण मूळ कारणांकडे दुर्लक्ष होतं. यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेलं पंधरा मिनिटांचं महत्त्व समजून घेऊया. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी या टिप्स महत्त्वाच्या आहेत. दीर्घ श्वसन, Brisk walk, Digital detox, पुस्तक वाचणं, गाणी ऐकणं, कुटुंबीयासमवेत वेळ घालवणं यामुळे आजार आणि ताण दूर राहतील.
advertisement
Hair Care : कोरड्या केसांसाठी अंडे का फंडा, विंटर स्पेशल एग हेअर मास्क
दीर्घ श्वसन - सकाळी उठल्यानंतर, थोडा वेळ डोळे बंद करा आणि हळूहळू दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमच्या मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसोल कमी होतं.
Brisk walk - व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल, तर जेवणानंतर किंवा संध्याकाळी 10-15 मिनिटं वेगानं चालत जा. यामुळे पचनशक्ती तर सुधारतेच पण हृदयाचं आरोग्यही सुधारतं. पंधरा मिनिटं चालण्यानं तुमचा मूड त्वरित सुधारतो.
Digital detox - दिवसातून किमान पंधरा मिनिटं तुमचा फोन दूर ठेवा. या काळात एखाद्या झाडाला पाणी घालू शकता, निसर्गातले आवाज ऐका किंवा शांत बसू शकता. स्क्रीनशिवायचा वेळ डोळे आणि मन दोन्ही शांत राहिल.
Discipline : स्वातंत्र्य म्हणजे शिस्तही, शरीर-मनासाठी शिस्त का महत्त्वाची ?
आवडतं गाणं ऐका किंवा पुस्तक वाचा - आवडतं गाणं ऐकण्यासाठी किंवा पुस्तक वाचण्यासाठी पंधरा मिनिटं देऊन बघा. संगीत ऐकल्यानं शरीरातून डोपामाइन बाहेर पडतं, डोपामाइन हे रासायनिक संदेशवाहक म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर आहे. चेतापेशींना संदेश वहनासाठी याची मदत होते. संगीत ऐकल्यामुळे दिवसाचा थकवा काही मिनिटांत दूर होण्यास मदत होते असं संशोधनातून दिसून आलं आहे.
प्रियजनांशी गप्पा मारा - दिवसातून पंधरा मिनिटं कुटुंबातील सदस्यांशी किंवा जुन्या मित्रांशी मनमोकळेपणानं बोला. हसण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि आतून आनंद वाटतो.
