TRENDING:

Metabolism : चयापचय वाढवण्यासाठी योगासनं उत्तम, शरीराला मिळेल ऊर्जा आणि वजन राहिल नियंत्रणात

Last Updated:

आयुष मंत्रालयाच्या मते, काही योगासनांमुळे चयापचयाचा वेग वाढवता येतो, ज्यामुळे शरीर आतून सक्रिय राहतं आणि वजन नियंत्रणात राहतं. कोणत्याही गोष्टींचं सातत्य असेल तर त्याचे परिणाम दिसून येतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वाढता स्क्रीनटाईम, जंक फूडची सवय, अनियमित दिनचर्या, आणि यामुळे शारीरिक हालचालींचा अभाव यांचा शरीराच्या चयापचयवर खोलवर परिणाम होतो. कमकुवत चयापचयामुळे लठ्ठपणा वाढतोच शिवाय तणाव, थकवा आणि पचनाच्या समस्या देखील निर्माण होतात. आयुर्वेद आणि योगामधे या समस्येवर एक अतिशय सोपा उपाय आहे.
News18
News18
advertisement

आयुष मंत्रालयाच्या मते, काही योगासनांमुळे चयापचयाचा वेग वाढवता येतो, ज्यामुळे शरीर आतून सक्रिय राहतं आणि वजन नियंत्रणात राहतं. कोणत्याही गोष्टींचं सातत्य असेल तर त्याचे परिणाम दिसून येतात.

High BP : रक्तदाबावर जपानी युक्ती, चालण्याचा पॅटर्न देईल ताकद, शरीर राहिल फिट

बद्धकोनासन: हे आसन केल्यानं पायांचे स्नायू सक्रिय होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं. तसंच, मांड्या आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चयापचय सक्रिय होतो. हे योगासन नियमित केल्यानं पचनसंस्था सुधारते आणि शरीराची कॅलरीज बर्न करण्याची क्षमता देखील वाढते.

advertisement

विपरिता करणी: या आसनात, भिंतीच्या आधारानं आपले पाय वरच्या दिशेने ठेवावेत. यामुळे डोक्याकडे रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे मेंदूला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळतं. यामुळे ताण कमी होतो, झोप चांगली येते आणि मानसिक आरोग्य सुधारतं. जेव्हा ताण कमी होतो तेव्हा कॉर्टिसोल म्हणजेच ताण संप्रेरकाची पातळी कमी होते, ज्याचा चयापचयवर सकारात्मक परिणाम होतो. यासोबतच, हे आसन थकवा दूर करतं आणि शरीरात ऊर्जा जाणवते.

advertisement

Fat Loss : अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खास टिप्स, शरीर होईल मजबूत

भुजंगासन: हे आसन सापाच्या आसनात केलं जातं, ज्याचा मणक्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्याचा थेट परिणाम पोटाच्या भागावर होतो. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.

पोटावरील चरबी कमी झाल्यावर शरीराचा चयापचय दर वाढू लागतो. तसंच, हे आसन फुफ्फुसांची क्षमता देखील वाढवतं, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो आणि शरीर अधिक ऊर्जा खर्च करते.

advertisement

पवनमुक्तासन: हे आसन शरीरातील वायू आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि पोटातील जळजळ कमी होते. पचन चांगलं होतं तेव्हा शरीर पोषक तत्वं जलद शोषून घेतं आणि ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया देखील जलद होते. या सर्वांमुळे चयापचय सुधारतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इस्लामपूरचा संभूआप्पाचा उरुस, 350 वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा काय?
सर्व पहा

अर्ध मत्स्येंद्रासन: हे आसन बसून केलं जातं. यामुळे मणक्याची लवचिकता वाढते आणि डिटॉक्स प्रक्रियेला गती येते. या आसनात शरीर वळवल्यानं अंतर्गत अवयवांवर दबाव येतो, ज्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडासारखे अवयव सक्रिय होतात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, ज्यामुळे चयापचय प्रणाली शुद्ध होते. याशिवाय कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Metabolism : चयापचय वाढवण्यासाठी योगासनं उत्तम, शरीराला मिळेल ऊर्जा आणि वजन राहिल नियंत्रणात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल