TRENDING:

Weight Loss Meal : लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी घ्या आयुर्वेदानुसार आहार, नैसर्गिकरीत्या वजन होईल कमी

Last Updated:

कठोर व्यायामापासून ते कठोर आहारापर्यंत, लोक अतिरिक्त किलो कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. पण, या सर्व प्रयत्नांनंतरही, वजन कमी करणं कधीकधी अशक्य होतं. यासाठी आयुर्वेदानंं सांगितलेल्या बाबींचं पालन केलं तर मदत होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वाढणारं वजन आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी..वजन कमी करायचं असेल तर आयुर्वेदानुसार काही पदार्थांचा आहारात समावेश करा, ज्यामुळे नैसर्गिक पद्धतींनी वजन कमी करता येईल.
News18
News18
advertisement

वजन कमी करण्यासाठी वेळ लागतो, काही काळानंतर अपेक्षित परिणाम न मिळाल्यानं निराश वाटू शकतं आणि अवघड समजून काम सोडून देण्याकडे कल वाढतो. कठोर व्यायामापासून ते कठोर आहारापर्यंत, लोक अतिरिक्त किलो कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. पण, या सर्व प्रयत्नांनंतरही, वजन कमी करणं कधीकधी अशक्य होतं. यासाठी आयुर्वेदानंं सांगितलेल्या बाबींचं पालन केलं तर मदत होऊ शकते. पहिला मुद्दा म्हणजे जेवणाची योग्य वेळ. कारण आपण जे खातो त्याबद्दल फक्त काळजी घेणं पुरेसं नाही तर त्याचबरोबर योग्य वेळी खाणं देखील खूप महत्वाचं आहे.

advertisement

योग्य वेळी अन्न खाणं का महत्त्वाचं ?

वजन कमी करण्यासाठी फक्त उष्मांक कमी असलेला आहार आवश्यक आहे असं अनेकांना वाटते, पण तसं नाही. खाण्याची वेळही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या शरीरातील पाचक अग्नी थेट सूर्याच्या स्थितीशी संबंधित आहे आणि दिवसा हा अग्नी सर्वात जास्त सक्रिय असतो. त्यामुळे, योग्य वेळी अन्न खाल्ल्यानं तुमच्या शरीराला अन्न पचणं आणि पोषकद्रव्यं शोषून घेणं सोपं होतं.

advertisement

Black Sesame Seeds : रक्तदाब नियंत्रणापासून मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त - काळे तीळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

वजन कमी करण्यासाठी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?

वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला योग्य वेळी खाण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागेल. तज्ज्ञांच्या मते, सूर्योदयाच्या वेळी हलका नाश्ता, दुपारचं जेवण आणि सूर्यास्तापूर्वी रात्रीचं जेवण हलकं ठेवा. याशिवाय, दिवसभरात जास्त कॅलरीज खाणं टाळा, कारण यामुळे तुमची चयापचय, पचन आणि इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे वजन वाढण्याचा आणि पोटाभोवती चरबी जमा होण्याचा धोका वाढतो.

advertisement

वजन कमी करण्यासाठी आणखी कोणते घटक आवश्यक आहेत ?

खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली देखील वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आहार आणि जेवणांच्या वेळांबरोबर आणखी दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.

1. झोप -

वाढतं वजन कमी करण्यात झोप महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण तुमच्या शरीरात दोन हार्मोन्स असतात, पहिले घरेलीन आणि दुसरे लेप्टिन. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्हाला नीट झोप येत नाही तेव्हा या दोन्ही हार्मोन्सवर परिणाम होतो आणि या असंतुलनामुळे रात्री जास्त खाण्याची इच्छा वाढते.

advertisement

Winter Heart Care Tips : हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक, पोषक आहार, व्यायाम, विश्रांतीकडे द्या लक्ष

2. हायड्रेशन -

अनेकदा आपल्याला भूक लागण्याऐवजी तहान लागलेली असते. त्यामुळे कधी खावं आणि कधी खाऊ नये असं वाटेल तेव्हा एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. याव्यतिरिक्त, तज्ज्ञांनी आपल्या खाण्याची वेळ सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यान 8-12 तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे.

3. मध -

आयुर्वेदानुसार वजन कमी करण्यासाठी मध हा नैसर्गिक उपाय आहे. मधामुळे पचनाला मदत होते, कफ कमी करणं आणि वजन कमी करण्यासाठी मध उपयुक्त आहे. कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू मिसळा आणि सकाळी प्या.

4.हळद-

हळद आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि कफ कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होते. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठीही हळद उपयुक्त आहे.

5.आवळा-

आवळ्यामुळे - वात, पित्त आणि कफाचं प्रमाण संतुलित राहतं. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते आणि मधुमेह, केसांचं आरोग्य आणि पचन देखील सुधारतं. यातील पोषक घटक अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करतात.

6. आलं

आल्यामुळे चयापचय वाढतं, पचन सुधारतं आणि कफ कमी करण्यात मदत होते. वजन कमी करण्याबरोबरच, हृदयाच्या आरोग्यासाठी देखील यामुळे मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Weight Loss Meal : लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी घ्या आयुर्वेदानुसार आहार, नैसर्गिकरीत्या वजन होईल कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल