Black Sesame Seeds : रक्तदाब नियंत्रणापासून मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त - काळे तीळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काळ्या तिळामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे ते नियमित खाणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
मुंबई : भारतीय पदार्थांमध्ये अनेक बिया वर्षानुवर्षं वापरल्या जातात. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक आजारांवर इलाज उपलब्ध आहे. यामुळे जेवणाची चव दुप्पट तर होतेच पण आपल्या शरीरात जाणवणाऱ्या अनेक समस्याही दूर होतात. काळ्या तिळामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे ते नियमित खाणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
चव वाढवण्यासोबतच यामध्ये प्रथिनंही भरपूर असतात. याचा उपयोग नवीन पेशी तयार करण्यासाठी होतो.
मॅग्नेशियम, कॅल्शियम, पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, ओमेगा -6, लोह, तंतुमयता आणि इतर अनेक पोषक तत्वं तिळामध्ये चांगल्या प्रमाणात असतात. तिळामध्ये आढळणारे घटक आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचं काम करतात.
advertisement
काळ्या तीळामध्ये, लोहाचं प्रमाण अधिक असल्यानं, हिमोग्लोबिनशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते तसंच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होते. काळ्या तिळामध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरातील रक्तदाब संतुलित करण्यासाठी उपयुक्त आहे.
रक्तदाब नियंत्रण -
काळ्या तीळात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाची शक्यता कमी करण्यासाठी काळे तीळ प्रभावी आहेत.
advertisement
हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त -
काळ्या तिळात मॅग्नेशियम, फायबर, लोह, फॅटी ऍसिडस्, जस्त याशिवाय इतर अनेक आवश्यक पोषक घटक असतात. काळ्या तीळातील कॅल्शियमचं प्रमाण सांध्यातील वेदना किंवा सूज कमी करुन हाडं मजबूत करण्यासाठी मदत करते.
advertisement
मधुमेह संतुलन
तिळामध्ये मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यांचा वापर करून, अतिसंवेदनशील मधुमेही रुग्णांमध्ये प्लाझ्मा ग्लुकोजची पातळी देखील संतुलित राहते.
पचनसंस्थेसाठी उपयुक्त
आजकालची जीवनशैली अशी आहे की अनेक वेळा लोकांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत काळे तीळ तुमची मदत करू शकतात. काळ्या तिळामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करून आपली पचनक्रिया सुधारते. काळ्या तीळांमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या दूर होतात.
advertisement
रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त
हिवाळ्यात काळ्या तिळाचा वापर केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हंगामी आजार होण्याची शक्यता कमी होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Black Sesame Seeds : रक्तदाब नियंत्रणापासून मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त - काळे तीळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे