केसांच्या समस्यांमुळे अनेकजण त्रासलेले असतात. काहींचे केस जास्त प्रमाणात गळतात तर काहींचे केस अजिबात वाढत नाहीत. काहींचे केस कोरडे असतात तर काहींचे केस तेलकट असतात. केसात कोंडा होणं आणि केस दुभंगणं या देखील समस्या भेडसावतात. आहार देखील या समस्यांचं कारण असतं. यासाठी आयुर्वेदात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
Tanning : टॅनिंग काढण्यासाठी नैसर्गिक फेस पॅक, त्वचा दिसेल तजेलदार
advertisement
आयुर्वेदात, केसांसाठी सर्वोत्तम आणि सर्वात वाईट पदार्थ सांगण्यात आलेत.
- आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार, फळं केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. पण, फळांचा रस पिण्यापेक्षा फळं खा असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
- दुधात भरपूर कॅल्शियम असतं म्हणूनच ते केसांसाठी फायदेशीर असतं.
- प्रक्रिया केलेल्या म्हणजेच प्रोसेस्ड चीजमधे जास्त मीठ असतं, म्हणून ते केसांसाठी फायदेशीर नाही.
- पांढरे किंवा काळे तीळ केसांसाठी खूप चांगले असतात.
- चहा किंवा कॉफीमुळे शरीरात कोरडेपणा म्हणजे शुष्कपणा जाणवतो त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन करणं चांगलं असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
- जास्त मद्यपान करणं केसांसाठी फायदेशीर नाही.
- व्हिटॅमिन सी नं समृद्ध आवळा केसांसाठी फायदेशीर आहे.
Immunity : नवतापात कशी वाढवाल रोगप्रतिकारशक्ती ? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- रताळ्यात चांगले अँटी-ऑक्सिडंट्स असतात आणि यामुळे केसांचं चांगलं पोषण होतं. म्हणूनच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रताळं खाणं फायदेशीर आहे.
- अनेकजण मोठ्या उत्साहानं शीतपेयं पितात. पण, आयुर्वेदिक डॉक्टरांनी शीतपेयं केसांच्या आरोग्यासाठी खूप वाईट असल्याचं म्हटलंय.
- बटाट्यांमुळे कोरडेपणा जाणवतो आणि केसांसाठी ते चांगले नाहीत असं तज्ज्ञ सांगतात.
- जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असतं आणि यामुळे केसांना चमक येते. म्हणूनच ओमेगा-3 असलेले घटक केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
