Tanning : टॅनिंग काढण्यासाठी नैसर्गिक फेस पॅक, त्वचा दिसेल तजेलदार

Last Updated:

नवतापा आणि आधी असलेल्या उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होणं ही एक सामान्य समस्या आहे. नैसर्गिक पद्धतीनं टॅन काढायचं असेल, तर चंदन सर्वोत्तम उपाय आहे.

News18
News18
मुंबई : आधी कडक ऊन, मधे पाऊस, परत ऊन असं वातावरण सध्या आहे. नवतापा आणि आधी असलेल्या उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होणं ही एक सामान्य समस्या आहे. नैसर्गिक पद्धतीनं टॅन काढायचं असेल, तर चंदन सर्वोत्तम उपाय आहे.
चंदनामध्ये दाहक-विरोधी आणि त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात, यामुळे टॅनिंग कमी होतं, आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. यासाठी चंदनासोबत आणखी काही नैसर्गिक घटक मिसळल्यानं त्वचा चमकदार दिसते.
advertisement
चमकदार त्वचेसाठी घरगुती फेस पॅक
1. चंदन, हळद, दह्याचा फेस पॅक
चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद, दही आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ते 15-20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
advertisement
2. चंदन आणि कोरफड
कोरफडीच्या ताज्या जेलमधे एक चमचा चंदन पावडर मिसळा आणि ते लावा. टॅनिंग दूर करण्यासोबतच, कोरफड त्वचेला थंडावा देण्यास देखील मदत करते. ही पेस्ट त्वचेला हायड्रेट करते आणि ती निरोगी बनवते.
3. चंदन आणि दूध
कच्च्या दुधात चंदन मिसळून पातळ पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. दूध नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते आणि स्वच्छ करते. नियमित वापरानं त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
advertisement
4.चंदन आणि दही
दह्यात चंदन मिसळून लावल्यानं त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि टॅनिंग हळूहळू कमी होते. दह्यात असलेलं लॅक्टिक एसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते.
5.चंदन आणि गुलाबजल
चंदन पावडर गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. गुलाबपाण्यानं त्वचा फ्रेश वाटते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
advertisement
या घरगुती उपायांचा अवलंब करून कोणत्याही रसायनांशिवाय त्वचेवरचं टॅनिंग दूर होतं. या नैसर्गिक घटकांचा नियमित वापर केल्यानं त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tanning : टॅनिंग काढण्यासाठी नैसर्गिक फेस पॅक, त्वचा दिसेल तजेलदार
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement