advertisement

Shocking : 'पोलिसांच्या भीतीने रेल्वे रुळावर धावले' अन्... पालघरमध्ये तीन जिगरी मित्रांचा दुर्दैवी अंत! काय घडलं?

Last Updated:

Paghar Shocking Accident : पालघर रेल्वे स्थानकाजवळ तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मात्र तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झालेले आहेत.

पालघर रेल्वे रुळांवर अपघातात तीन तरुणांचा मृत्यू
पालघर रेल्वे रुळांवर अपघातात तीन तरुणांचा मृत्यू
पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. जिथं मालगाडी खाली येऊन तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसात मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना समोर आल्यानंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांनी अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झालेली असून संपात व्यक्त करण्यात आलेला आहे. नेमकं त्या रात्री काय घडलं शिवाय याबाबत आता विविध चर्चा सुरु असून या सर्व घटनेमागील सत्य काय असेल याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पालघर दुर्घटनेतील 'त्या' गूढ रात्रीचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकाजवळी जैन मंदिरातजवळ ही घटना घडली. घडलेल्या या दुर्घटनेत 23 वर्षीय स्वप्नील पालांडे तर 23 वर्षीय कुणाल कुमार दुबळा आणि 28 वर्षीय अफरोज खलील शेख या तीन तरुणांचा दुर्देवी मृ्त्यू झालेला असून तिन्ही तरुण ही पालघरच्या वीरेंद्र नगर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आलेली आहे.
advertisement
कुटुंबियांचे आरोप काय?
घटनेच्या रात्री हे तरुण रेल्वे परिसरात बसले होते. त्या दरम्यान काही पोलिस सिव्हिल कपड्यांमध्ये तेथे आले आणि तरुणांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, असा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र त्याच दरम्यान सुरु असलेल्या गोंधळात तरुण रेल्वे रुळावरुन पळू लागले आणि रुळावर वेगाने येणाऱ्या मालगाडीची तरुणांना धडक बसली ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
दरम्यान पोलिसांनी कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार, तिघा तरुणांनी मालगाडीसमोर येऊन आपले जीवन संपवले असल्याचा दावा करण्यात आला. मात्र पोलिसांचा हा दावा कुटुंबियांनी फेटाळून लावला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : 'पोलिसांच्या भीतीने रेल्वे रुळावर धावले' अन्... पालघरमध्ये तीन जिगरी मित्रांचा दुर्दैवी अंत! काय घडलं?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement