advertisement

Salman Ali Agha : नेमकी चूक कुणाची? मैदानात 'राडा' अन् वादग्रस्त Run Out नंतर भडकला सलमान अली आगा! काय म्हणाला?

Last Updated:

Salman Ali Agha Controversial Run Out : पाकिस्तानने मॅच 128 रन्सनी जिंकून 3 मॅचच्या सिरीजमध्ये 1-1 ची बरोबरी साधली आहे. अशातच या मॅचनंतर सलमान अली आगा वादग्रस्त रनआऊटवर चांगलाच भडकला.

Salman Ali Agha breaks silence on run-out controversy with Mehidy Hasan
Salman Ali Agha breaks silence on run-out controversy with Mehidy Hasan
Salman Ali Agha run out controversy : पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशसमोर विजयासाठी 275 रन्सचे चॅलेंज ठेवलं होतं. या स्कोअरचा पाठलाग करताना बांगलादेशची टीम ठराविक अंतराने विकेट्स गमावत गेली आणि पूर्ण टीम केवळ 114 रन्सवर ऑलआऊट झाल्याचं पहायला मिळालं. जशी परिस्थिती बांगलादेशने पाकिस्तानची पहिल्या वनडे सामन्यात केली होती, तशीच परिस्थिती पाकिस्तानने बांगलादेशची दुसऱ्या वनडे सामन्यात केलीये. पाकिस्तानने ही मॅच 128 रन्सनी जिंकून 3 मॅचच्या सिरीजमध्ये 1-1 ची बरोबरी साधली आहे. अशातच या मॅचनंतर सलमान अली आगा वादग्रस्त रनआऊटवर चांगलाच भडकला.

स्पोर्टमन स्पिरिटवर प्रश्नचिन्ह...

वादग्रस्त रनआऊटनंतर सलमान अली आगा चांगलाच भडकल्याचं पहायला मिळालं. त्याने थेट स्पोर्टमन स्पिरिटवर प्रश्नचिन्ह उभे केले. जर तुम्ही मला विचारलं असतं की मी काय केलं असतं, तर मी नक्कीच गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळल्या असत्या, असं सलमान अली आगा म्हणाला. सलमान अली आगाने हे मान्य केले की मेहदी हसन मिराजने जे केले ते क्रिकेटच्या नियमांच्या चौकटीतच होतं, मात्र त्या क्षणी घेतलेला निर्णय हा खेळाडूच्या मानसिकतेवर अवलंबून असतो, असंही सलमान आगा म्हणाला.
advertisement

खेळभावना सर्वोच्च असायला हवी - सलमान अली आगा

मी असा व्यक्ती आहे जो नेहमी नियमांचे पालन करण्याला प्राधान्य देतो. नियमानुसार मिराजने जे केले ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे आणि जर त्याला ते योग्य वाटत असेल, तर ठीक आहे. जेव्हा आपण खिलाडूवृत्तीबद्दल बोलतो, तेव्हा मला वाटते की परिस्थिती काहीही असो, खेळभावना ही सर्वोच्च असायला हवी, असं म्हणत त्याने बांगलादेशच्या कॅप्टनला टोमणा देखील मारला.
advertisement
advertisement

39 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?

पाकिस्तानच्या इनिंगमधील 39 व्या ओव्हरमध्ये ही नाट्यमय घटना घडली. बांगलादेशचा कॅप्टन मेहदी हसन मिराज ही ओव्हर टाकत होता, तेव्हा सलमान अली आगा विचित्र पद्धतीने आऊट झाला. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिझवानने समोरच्या दिशेला एक सरळ शॉट मारला, जो नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या सलमान आगाच्या दिशेने गेला. बॉल अडवण्यासाठी मेहदी हसन मिराज वेगाने धावला आणि त्याच वेळी त्याची सलमान अली आगाशी धडक झाली. पण सलमानला त्याची चूक लक्षातच आली नाही.
advertisement
advertisement

अंपायरकडे अपील केली अन्...

मेंहदी हसन मिराजने खाली पडलेला बॉल उचलला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, पाकिस्तानी बॅट्समन अजूनही क्रीझच्या बाहेरच उभा आहे. प्रसंगावधान राखून त्याने लगेच सलमानला रन आऊट केलं आणि अंपायरकडे जोरात अपील केली. ही पूर्ण घटना इतकी वेगाने घडली की सलमानला क्रीझमध्ये परतण्याची संधीच मिळाली नाही. सलमानला काहीही लक्षात येण्याआधी त्याची विकेट गेली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Salman Ali Agha : नेमकी चूक कुणाची? मैदानात 'राडा' अन् वादग्रस्त Run Out नंतर भडकला सलमान अली आगा! काय म्हणाला?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement