केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण तुमच्या आहारात काही बदल केलेत तर व्हिटॅमिन सी, ई आणि लोहयुक्त पदार्थ वाढवू शकता. हे सर्व पोषक घटक तुमच्या केसांची चमक, ताकद वाढवतील आणि यामुळे केस वाढतील. याशिवाय कढीपत्ता, मेथी, तुरटी, शिकाकाई, जास्वंदाची फुलं, कडुनिंबाची पानं, दालचिनी पावडर आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळून खोबरेल तेल लावू शकता.
advertisement
Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे बदल करा, प्रतिकारशक्तीही वाढेल
हे सर्व घटक तुमचे केस गळणं आटोक्यात ठेवण्यास पूर्णपणे मदत करतात. याशिवाय, टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील हे घटक उपयुक्त आहेत. याशिवाय, यामुळे तुमच्या केसांना भरपूर पोषण आणि आर्द्रता मिळते. हे सर्व घटक खोबरेल तेलात मिसळून लावल्यानं कोंड्याची समस्याही दूर होते. त्यामुळे साधं खोबरेल तेल लावण्याऐवजी यापैकी एखादी गोष्ट मिसळून लावल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
Cinnamon : महिलांच्या आरोग्य समस्यांवर रामबाण उपाय - दालचिनी, जाणून घेऊया फायदे
या गोष्टीही लक्षात ठेवा
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही केस गळतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 9, ई, व्हिटॅमिन 7 समाविष्ट आहे.
केस गळणं थांबवण्यासाठी काय खावं ?
रताळं - यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, ज्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते.
तुम्ही राजमा खाऊ शकता, त्यात फायबर, प्रोटीन आणि फोलेट हे घटक असतात.
आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
ओट्स खा, त्यात फायबर, लोह, झिंक, ओमेगा फॅटी ॲसिड असतात.