Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे बदल करा, प्रतिकारशक्तीही वाढेल

Last Updated:

वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायाम यासारख्या बाबी महत्त्वाच्या आहेतच, पण दैनंदिन आयुष्यात काही बदल करणं आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई : लठ्ठपणा वाढला की, अनेक आजार होण्यास सुरुवात होते. शरीराची तंदुरुस्ती राखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती कायम चांगली राहावी यासाठी काही बदल करणं गरजेचं आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये, लठ्ठपणाची समस्या वाढते आहे. म्हणूनच आपल्या दिनचर्येमध्ये बदल करणं आवश्यक आहे.
हिवाळ्यात लठ्ठपणाची समस्या अधिक वाढते. कारण या काळात आपण जास्त कॅलरी असलेलं अन्न खाल्लं जातं आणि एरवीपेक्षा शारीरिक हालचाली देखील कमी होतात. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही
तुमच्या दिनचर्येत काही छोटे बदल करून ते करू शकता.
लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार तर होतातच पण त्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमताही कमकुवत होते. पाहूया वजन कमी करण्यासाठी कोणते बदल करावेत.
advertisement
1. कोमट पाणी-
दिवसाच्या सुरुवातीला कोमट पाणी प्या. अनेकांना सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या.
advertisement
2. व्यायाम -
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारासोबतच व्यायामही खूप महत्त्वाचा आहे. वजन नियंत्रित करायचं असेल तर योगा, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येत चालणं किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे.
advertisement
3. हंगामी फळं -
प्रत्येक ऋतूत येणारी हंगामी फळं खा. आरोग्यासाठी फळं खूप फायदेशीर मानली जातात. वजन नियंत्रित ठेवायचं असेल आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेलतर तुमच्या आहारात हंगामी फळांचा अवश्य समावेश करा.
4. जंक फूडपासून दूर राहा -
आजच्या जमान्यात जंक फूड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. प्रक्रिया केलेलं अन्न खाल्ल्यानं लठ्ठपणा येतो. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर या गोष्टींपासून दूर राहा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे बदल करा, प्रतिकारशक्तीही वाढेल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement