Cinnamon : महिलांच्या आरोग्य समस्यांवर रामबाण उपाय - दालचिनी, जाणून घेऊया फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दालचिनी केवळ मसालाच नाही तर आयुर्वेदिक औषध देखील आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म महिलांसाठी महत्त्वाचे ठरतात. दालचिनी अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपचार आहे.
मुंबई : भारतीय स्वयंपाकघरातल्या अनेक मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. याचा उपयोग सर्वांना होतोच पण महिलांना हे मसाले विशेष उपयुक्त का ठरतात, याविषयीची ही माहिती. महिलांच्या 5 आरोग्य समस्यांवर दालचिनी रामबाण उपाय आहे. जाणून घ्या दालचिनीचे महिलांसाठी फायदे:
दालचिनीमधले अनेक गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. दालचिनी विशेषतः महिलांसाठी फायदेशीर मानली जाते. कारण दालचिनी केवळ मसालाच नाही तर आयुर्वेदिक औषध देखील आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म महिलांसाठी महत्त्वाचे ठरतात. दालचिनी अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपचार आहे.
advertisement
दालचिनी हा महिलांच्या आरोग्याच्या अनेक समस्यांवर प्रभावी घरगुती उपाय आहे. त्याचा योग्य वापर करून आरोग्याच्या समस्या टाळता येतात आणि शरीरही निरोगी ठेवता येतं.
1. मासिक पाळीतील अनियमितता आणि वेदनांपासून आराम
अनियमित पाळी, हा अनेक महिलांसमोरचा प्रश्न आहे. जास्त रक्तस्त्राव होणं किंवा मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना या समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. दालचिनीमध्ये असलेले घटक रक्त प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतात.
advertisement
दालचिनी कशी वापरावी ?
अर्धा चमचा दालचिनी पावडर एक कप गरम पाण्यात मिसळून दिवसातून एकदा प्या. याला मधात मिसळून घेतल्यानंही फायदा होतो.
2. वजन कमी करण्यास उपयुक्त
दालचिनी चयापचय गतिमान करण्यास आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
कृती - कोमट पाण्यात किंवा ग्रीन टीमध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
advertisement
3. PCOD आणि हार्मोनल संतुलन
PCOD ही एक समस्या वाढत चालली आहे, यामुळे महिलांच्या संप्रेरकांचं असंतुलन होतं. दालचिनी इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून हार्मोन्स संतुलित करण्यासाठी उपयुक्त आहे.
कृती - दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर दूध किंवा कोमट पाण्यासोबत घ्या. स्मूदीज, ओट्स किंवा चहामध्ये ही दालचिनीचा समावेश करा.
advertisement
4. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते
दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे मुरुम आणि मुरुमाचे डाग कमी करण्यासाठी मदत होते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो.
कृती - १ चमचा मधात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून फेस पॅक बनवा आणि १५ मिनिटं लावा.
advertisement
रोज कोमट पाण्यासोबत दालचिनी पावडर प्यायल्यानंही त्वचा सुधारते.
5. मधुमेह आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण
दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून टाईप-2 मधुमेहाचं व्यवस्थापन करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त आहे.
दालचिनीचा वापर कसा करावा?
रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळून प्या. हे दही, स्मूदी किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकतो.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा:
दालचिनी जास्त प्रमाणात खाऊ नका, त्याचा परिणाम यकृतावर होऊ शकतो.
गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दालचिनी खाऊ नये.
आपल्याला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास, ते वापरण्यापूर्वी सल्ला घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cinnamon : महिलांच्या आरोग्य समस्यांवर रामबाण उपाय - दालचिनी, जाणून घेऊया फायदे


