advertisement

Face : चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी वापरा मध, डाग होतील गायब

Last Updated:

चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्या चमक यावी यासाठी तुम्ही उत्तर शोधत असाल तर, मध हा एक चांगला पर्याय आहे. मध लावण्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल.

News18
News18
मुंबई : चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्या चमक यावी यासाठी तुम्ही उत्तर शोधत असाल तर, मध हा एक चांगला पर्याय आहे. मध लावण्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. त्यासाठी पाहूया त्वचेवर मध लावण्याची योग्य पद्धत आणि त्याचा योग्य वापर कसा करावा.
मधामध्ये औषधी गुणधर्म असतात, त्याचा वापर गोडवा वाढवण्यासाठी होतो तसाच तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. मधामध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीऑक्सिडंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेसाठी उत्कृष्ट नैसर्गिक उपाय ठरतात.
तुम्हाला जर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये मधाचा समावेश करा. त्वचेची निगा राखण्याआधी, त्वचेवर मध लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे.
advertisement
१. त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्यासाठी उपयुक्त
मधामुळे त्वचेतील आर्द्रता राखली जाते. यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेटेड राहते, ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. शुद्ध मध थेट चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटं राहू द्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा.
advertisement
२. चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी उपयुक्त
मधामध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम घालवण्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे त्वचेवर बॅक्टेरियाचा प्रभाव कमी होतो आणि डाग कमी करण्यासाठी मदत होते. चिमूटभर हळद पावडर मधात मिसळून मुरुम किंवा डाग असलेल्या ठिकाणी लावा. 10-15 मिनिटांनी धुवा.
3. त्वचेला मिळते नैसर्गिक चमक
मधामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला प्रदूषणापासून वाचवतात. यामुळे त्वचेच्या पेशींचं नूतनीकरणासाठी मदत होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. एक चमचा मधात लिंबाचा रस मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा.
advertisement
4. सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त
मधामुळे त्वचा तरुण होण्यास मदत होते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा दीर्घकाळ तरूण राहते. केळीची पेस्ट एक चमचा मधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर कोमट पाण्यानं धुवा.
5. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उपयुक्त
मधामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम्स त्वचेला एक्सफोलिएट करतात आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. मधात साखर किंवा ओट्स मिसळा आणि स्क्रब म्हणून वापरा.
advertisement
हळूवारपणे मसाज करा आणि 5-10 मिनिटं राहू द्या आणि नंतर धुवा.
मध लावण्याची योग्य पद्धत
प्रथम चेहरा कोमट पाण्यानं धुवून स्वच्छ करा, जेणेकरून चेहऱ्यावरची छिद्र उघडतील. यासाठी सेंद्रिय आणि शुद्ध मध वापरा. मध लावल्यानंतर, 10-20 मिनिटं राहू द्या. कोमट पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा वापरा.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा:
जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल, तर मध वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
फक्त शुद्ध आणि सेंद्रिय मध वापरा, कारण बाजारात उपलब्ध असलेल्या प्रक्रिया केलेल्या मधात रसायनं असू शकतात.
मधाचा नियमित वापर केल्यानं तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण बनते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Face : चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी वापरा मध, डाग होतील गायब
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement